नियम मोडल्यास कडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:53 AM2021-02-25T04:53:52+5:302021-02-25T04:53:52+5:30
दहिवडी : दहिवडीची वाढती कोरोनाची संख्या ही चिंताजनक बाब असून, कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य तपासणी करून घ्यावी जे ...
दहिवडी : दहिवडीची वाढती कोरोनाची संख्या ही चिंताजनक बाब असून, कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य तपासणी करून घ्यावी जे कोणी या नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील,’ अशा कडक सूचना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिल्या. दरम्यान, बुधवारी लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी खांडसरी चौक, फलटण चौक या ठिकाणी लांबपल्ल्याच्या वाहतुकीसाठीच प्रवेश दिला जात आहे. यासाठी पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे. नगरपंचायतीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी व्यापाऱ्यांनी दहिवडी ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन तपासणी करून घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, मास्कचा वापर सोशल डिस्टन्स न पाळणारे तसेच विनाकारण हिंडणाऱ्या आणि नियम तोडणारे लोक असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. लाॅकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात दहिवडीकरांनी चांगला प्रतिसाद दिला होता तसाच प्रतिसाद दहिवडीकरांनी द्यावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी शेखरसिंह गुरुवारी दहिवडी शहराला भेट देऊन कोरोना नियंत्रणासाठी काय उपाययोजना केल्या. या संबंधी माहिती घेणार आहेत.
२४दहिवडी
दहिवडी शहरात येणारे वाड्या-वस्त्यांवरील सर्व रस्ते सील केल्याने रस्त्यावर शुकशुकाट होता. (छाया : नवनाथ जगदाळे)