पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:58+5:302021-05-21T04:41:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असे आदेश ...

Strict enforcement by the police | पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी

पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पोलिसांनी नियमांची कडक अंमलबजावणी करावी, असे आदेश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात बैठक घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गर्दी होऊ नये, वाहतूक अत्यावश्यकच असावी यासाठी प्रशासनाचे विविध नियम आहेत. पोलीस या नियमांची अंमलबजावणी करीत आहेत. सातारा पोलीस चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये पोलिसांबद्दल रोष वाढत आहे.

कोरोनाची परिस्थिती वाईट आहे. अशात नियमांचे पालन कोणी करीत नसेल तर पोलीस कारवाईसाठी कमी पडणार नाहीत. उलट पोलीस काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करावी, असे आदेश दिले आहेत. तसेच सातारकरांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

शहर पोलीस ठाण्याच्या दालनात सुमारे अर्धा तास ही बैठक झाली. अचानक मंत्री पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांची गडबड उडाली. बैठक झाल्यानंतर मंत्र्यांनी पोलिसांची आस्थेवाईपणे चौकशी करून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी सातारा शहरचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे उपस्थित होते.

Web Title: Strict enforcement by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.