वाठार निंबाळकरमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:49 AM2021-04-30T04:49:03+5:302021-04-30T04:49:03+5:30
वाठार निंबाळकर : वाठार निंबाळकरमध्ये बुधवारपासून कडकडीत बंद पाळण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत. वाठार निंबाळकर ...
वाठार निंबाळकर : वाठार निंबाळकरमध्ये बुधवारपासून कडकडीत बंद पाळण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.
वाठार निंबाळकर हे गाव सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र घोषित झाले आहे. त्यामुळे २८ एप्रिलपासून पुढील आदेश होईपर्यंत ग्रामपंचायत हद्दीत दररोज सकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत दूध, भाजीपाला अशा सेवा सुरू राहतील. या व्यतिरिक्त इतर आस्थापना बंद राहतील. तसेच इतर अत्यावश्यक वस्तू नागरिकांना घरपोच मिळणार आहे. दवाखाने व मेडिकलवगळता कोणतेही दुकान उघडता येणार नाही. या आदेशानुसार कोणी आदेशाचे पालन न केल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच कोणी दुकान उघडल्याचे निदर्शनास आले तर सदर दुकान सील करण्यात येणार असल्याचे शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.