वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:40 AM2021-02-11T04:40:26+5:302021-02-11T04:40:26+5:30
शिवनगर (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय ...
शिवनगर (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय व कृष्णा कारखान्याच्या संयुक्त विद्यामाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मोटार वाहन निरीक्षक ॠषिकेश कोराणे म्हणाले, वाहनांचा वेग ठरवून दिला आहे. अतिवेगाचा वापर करू नये. वाहन चालकांनी व्यसन करू नये. वाहन चालविताना मोठमोठ्याने गाणी लावू नयेत. ओव्हरलोड वाहने चालवू नयेत. यासारख्या गोष्टी लक्षात घेवून अपघात रोखता येतील. अपघात होऊ नये म्हणून प्रत्येकाने सावधगिरी बाळगून वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून रस्ता सुरक्षा अभियान साजरे करण्यात येत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. देशात दरवर्षी दीड लाखापेक्षा जास्त लोकांचा रस्ते अपघातात बळी जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना मान्यवरांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
मनोज पाटील, मुकेश पवार, मुख्य शेती अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, वाहतूक अधिकारी गजानन प्रभूणे, ऊस विकास अधिकारी पंकज पाटील, विजय मोहिते, कामगार कल्याण अधिकारी अरुण पाटील, संरक्षण अधिकारी संपतराव पाटील, स्टोअर किपर जी. बी. मोहिते, विजय पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल निकम, आदी उपस्थित होते.