घंटागाडी चालक संपावर; बाहेरचे रोजंदार कामावर!--६० टन कचºयाची विल्हेवाट :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:31 PM2017-09-29T23:31:47+5:302017-09-29T23:38:12+5:30

Strike driver strikes; Outdoor employment at work! - Disposal of 60 tons of waste: | घंटागाडी चालक संपावर; बाहेरचे रोजंदार कामावर!--६० टन कचºयाची विल्हेवाट :

घंटागाडी चालक संपावर; बाहेरचे रोजंदार कामावर!--६० टन कचºयाची विल्हेवाट :

Next
ठळक मुद्देकर्मचाºयांचे उपोषण दुसºया दिवशीही सुरूचतोडगा काढून शहराची झाडून स्वच्छता केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नगरपालिकेच्या ई-टेंडर प्रणालीला विरोध दर्शवित घंटागाडी संघटनेच्या कर्मचाºयांनी पालिकेत उपोषण सुरू केले आहे. असे असूनही उपोषणाच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २९) पालिकेच्या वतीने शहरातील सर्व कचरा उचलण्यात आला. रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, एक कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने तब्बल ६० टन कचरा गोळा केला.

सातारा शहरातील चाळीस वॉर्डातून ४२ घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. दिवसभरात तब्बल ७० ते ७५ टन कचरा गोळा करून त्याची सोनगाव कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते. दरम्यान, पालिका प्रशासनाच्या वतीने घंटागाडीसाठी नव्याने राबविण्यात येणाºया ई-टेंडर पद्धतीला अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाने विरोध दर्शविला असून, हा निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून (दि. २८) पालिकेत उपोषण सुरू केले आहे.

शुक्रवारी उपोषणाचा दुसरा दिवस असल्याने व सर्वच घंटागाड्यांची चाके थांबल्याने शहरात साचणारा कचरा उचलणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने यावर तोडगा काढून शहराची झाडून स्वच्छता केली.
रोजंदारीवर काम करणारे ४० कर्मचारी, चार ट्रॅक्टर, एक कॉम्पॅक्टर आणि दोन टीपरच्या माध्यमातून आरोग्य विभागाने शहरातील जागो-जोगी साचलेला कचरा गोळा करून त्याची सोनगाव डेपोत विल्हेवाट लावली. दिवसभरात तब्बल ६० टन कचरा गोळा करण्यात आला.

पालिकेच्या आवारात घंटागाड्या उभ्या
घंटागाडी संघटनेच्या वतीने गुरुवारी पालिकेच्या आवारात घंटागाड्या उभ्या करून उपोषण सुरू करण्यात आले. शुक्रवारी दुसºया दिवशीही बहुतांश घंटागाड्या पालिकेच्या आवारातच उभ्या होत्या.
७० कचरा वेचकांची मदत
सोनगाव कचरा डेपोत साचणाºया कचºयातून प्लास्टिक, लोखंड व इतर भंगाराचे साहित्य गोळा केले जाते. जवळपास ७० कचरावेचक हे काम करून आपला उदरनिर्वाह चालवितात. शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वतीने या सर्व कचरावेचकांची मदत घेऊन शहरातील कचरा गोळा करण्यात आला.

... चौकाचौकात कचरा ‘कोंडी’
शुक्रवारी सकाळी वॉर्डामध्ये घंटागाडी न आल्याने बहुतांश गृहिणींनी साचलेला कचरा कुंडीत टाकला. त्यामुळे अनेक ठिकाणच्या कचरा कुंड्या हाऊसफुल्ल झाल्या होत्या. शहरात जवळपास ७५ कचरा कुंड्या असून, पालिकेच्या वतीने कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून सर्व कुंड्या रिकाम्या करण्यात आल्या.

Web Title: Strike driver strikes; Outdoor employment at work! - Disposal of 60 tons of waste:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.