सातारा जिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:12 PM2017-08-02T16:12:24+5:302017-08-02T16:13:16+5:30

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला. धरण क्षेत्रातही पावसाने उघडीप दिल्याने बहुतांश धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पश्चिम भागात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी कोरेगाव, कºहाड, फलटण, माण, खटाव आणि खंडाळा या सहा तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही. मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळपर्यंत या तालुक्यांमध्ये शून्य मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Strike in six talukas in Satara district | सातारा जिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये ठणठणाट

सातारा जिल्ह्यात सहा तालुक्यांमध्ये ठणठणाट

Next
ठळक मुद्देपावसाचा जोर ओसरला कोयनेत ७९ टीएमसी पाणीसाठा

सातारा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला. धरण क्षेत्रातही पावसाने उघडीप दिल्याने बहुतांश धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पश्चिम भागात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी कोरेगाव, कºहाड, फलटण, माण, खटाव आणि खंडाळा या सहा तालुक्यांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही. मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळपर्यंत या तालुक्यांमध्ये शून्य मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जोर ओसरल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाºया कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. या धरणात ७९.६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठा नियंत्रीत करण्यासाठी जिल्ह्यातील लहान मोठ्या ११ धरणांमधून सोमवार, दि. १ रोजी विसर्ग करण्यात आला होता. मात्र, मंगळवारी जोर ओसरल्याने नदी पात्रात सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले.

१०५.२५ टीएसमी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणात आता ७९.६३ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणात प्रतिसेकंद ९ हजार २९७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयनेतून पायथा वीजगृहासाठी २ हजार १६६ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

२४ तासात ४० मिलीमीटर

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर व बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत केवळ ४०.२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सातारा तालुक्यात ०.४ मिलीमीटर, जावळी ४.५, पाटण ३.९, वाई ०.२ तर महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक ३१.२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजअखेर एकूण ७ हजार २२६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Web Title: Strike in six talukas in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.