संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वेठीस धरले : ओव्हाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:14+5:302021-09-21T04:44:14+5:30

सातारा : जिल्हा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून रुग्णांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी ...

The striking staff held the patients in their arms: Oval | संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वेठीस धरले : ओव्हाळ

संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वेठीस धरले : ओव्हाळ

Next

सातारा : जिल्हा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारून रुग्णांना वेठीस धरण्याचे काम केले आहे. संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी करा, या मागणीसाठी रिपाइंच्या वतीने दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयसमोर निदर्शने करण्यात आली.

जिल्हा रुग्णालयामधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपामुळे सर्वसामान्य रुग्ण, गरोदर माता, वृद्ध, लहान बालके, डायलेसिस रुग्णांना वेठीस धरून मनमानी कारभार केला आहे. अनुकंपा व पदोन्नती भरतीमध्ये पैसे घेऊन घोटाळा होऊ नये म्हणून जो चौकशीअंती निर्णय घेणार आहे. त्यास आम्ही पाठिंबा देत आहे परंतु, ज्या काही अनुकंपाच्या भरती होणार आहेत त्यामध्ये खऱ्या वारसांना डावलले जाऊ नये. अन्यथा रिपब्लिकन पक्ष जनरल कामगार युनियनचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, यास सर्वस्वी जिल्हा रुग्णालय प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष दादा ओव्हाळ, सोमनाथ धोत्रे, जयवंत कांबळे, किरण ओव्हाळ, शेखर अडागळे आदी उपस्थित होते.

फोटो :सातारा येथील जिल्हा रुग्णालयासमोर रिपाइंने निदर्शने केली. छाया : जावेद खान

Web Title: The striking staff held the patients in their arms: Oval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.