तारेवरची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:50 AM2021-06-16T04:50:00+5:302021-06-16T04:50:00+5:30
मेढा : सातारा-महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून, वानहधारकांचा प्रवास सुखकर ...
मेढा : सातारा-महाबळेश्वर रस्ता रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास आले असून, वानहधारकांचा प्रवास सुखकर झाला आहे; परंतु मेढा-महामबळेश्वर मार्गावरील केळघर घाटाची अवस्था खोदकामामुळे अत्यंत भीषण झाली आहे. रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांमधून होत आहे.
बंदोबस्ताची मागणी
सातारा : शहरातील गुरुवार बाग, शनिवार पेठ परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही कुत्री वाहनचालक व पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जात आहे. त्यामुळे या कुत्र्यांचा पालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघाताचा धोका
पळशी : शिंगणापूर-म्हसवड मार्गावरील स्मशानभूमीशेजारी असणाऱ्या नागमोडी वळणाला झुडपांनी वेढा दिला आहे. त्यामुळे बऱ्याचदा समोरून येणारे वाहन चालकांच्या नजरेस पडत नाही. या धोकादायक वळणावर अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, बांधकाम विभागाने या वळणावर सूचना फलक बसविणे गरजेचे आहे.
वाहतुकीची कोंडी
सातारा : शहरातील तांदूळआळी, चांदणी चौक व खणआळी या परिसरात वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक खासगी तसेच मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याकडेला लावली जात असल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. याचा पादचाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या वाहतूक शाखेने अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.