सह्याद्रीच्या कड्यांना वीरांची नावे देण्याची जोरदार मागणी

By admin | Published: December 17, 2014 10:06 PM2014-12-17T22:06:59+5:302014-12-17T23:03:04+5:30

...गर्जामहाराष्ट्र माझा

Strong demand for the names of heroes of Sahyadri | सह्याद्रीच्या कड्यांना वीरांची नावे देण्याची जोरदार मागणी

सह्याद्रीच्या कड्यांना वीरांची नावे देण्याची जोरदार मागणी

Next

सातारा/महाबळेश्वर : छत्रपती शिवरायांच्या फौज फाट्यात सातारा जिल्ह्यातील अनेक पराक्रमी मावळ्यांचा सहभाग होता. यामध्ये सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, जीवा महाले अशा अनेक वीरांनी स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावली. आज या शूरवीरांचा सर्वांनाच विसर पडलेला दिसतो. म्हणूनच या शूरांचे स्मरण राहण्यासाठी महाबळेश्वर येथील ब्रिटिशकालीन पॉर्इंटची नावे बदलून त्यांना या वीरांची नावे देण्यात काहीच गैर नाही. अशी जोरदार प्रतिक्रिया जिल्ह्यातून उमटत आहे.
सुमारे ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी मुघल साम्राज्याच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्यासाठी अवघ्या सोळाव्या वर्षी हातात तलवार घेतली. अठरा पगड जातीधर्मातल्या आपल्या मावळ्यांना घेऊन त्यांनी रायरेश्वर गडावर रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेतली. कालांतराने शिवरायांनी सह्याद्रीच्या डोंगररांगेत लढाया केल्या. यात अनेक मावळ्यांनी प्राणाची बाजी लावली. मात्र, व्यापार करण्यासाठी भारतात आलेल्या ब्रिटिशांनी एक-एक करून अनेक राज्यांमध्ये आपली राजवट स्थापित केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपली नावे त्या-त्या भागाला दिली. आजही त्याच नावाने ती ओळखली जातात. महाबळेश्वरला आल्यानंतर ब्रिटिशांनी याठिकाणी असणाऱ्या पॉर्इंटला आपलीच नावे देऊन टाकली.
सुमारे ६६ वर्षांपूर्वी इंग्रजांचे राज्य खालसा होऊनही महाबळेश्वर येथील पॉर्इंटला त्यांची नावे आजही तशीच राहिली आहे. हे पॉर्इंट सरदार व मावळ्यांच्या नावाने ओळखले जावेत, यासाठी ‘लोकमत’ ने मोहीम सुरू केली आहे. शूरवीरांच्या स्मृती निरंतर जतन करता याव्यात, यासाठी महाबळेश्वरमधील पॉर्इंटचे नव्याने नामकरण झालेच पाहिजे, असा सूर आता जिल्ह्यातून उमटू लागला
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Strong demand for the names of heroes of Sahyadri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.