एसटीचे ‘सीमाेल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:55+5:302021-07-10T04:26:55+5:30

सातारा : आजवर ‘गरिबांचा रथ’ म्हणून ओळखला जात असलेली एसटी खरोखरच दिवसेंदिवस गरीब होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ...

ST's 'border violation'; Travelers stay at home! | एसटीचे ‘सीमाेल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच!

एसटीचे ‘सीमाेल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच!

googlenewsNext

सातारा : आजवर ‘गरिबांचा रथ’ म्हणून ओळखला जात असलेली एसटी खरोखरच दिवसेंदिवस गरीब होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने आंतरजिल्हा, जिल्ह्यांर्गत तसेच परराज्यात एसटीच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. मात्र प्रवासी घरात बसून असल्याने एसटीच्या उत्पन्नात फारसा फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मार्चपासून ऑक्टोबरपर्यंत ‘गरीबरथा’ची चाके एकाच ठिकाणी खिळली होती. या काळात काहीच उत्पन्न न मिळाल्याने एसटी महामंडळ अडचणीत आले होते. कर्मचाऱ्यांचा पगार करण्याएवढेही उत्पन्न न मिळाल्याने राज्य शासनाने अनेक वेळा मदत घेण्याची वेळ आली होती.

आता एसटीला चांगले दिवस येतील, असे वाटत होते. यासाठी एसटीने नियोजन केले आहे. गाड्या सॅनिटाइझ करुन सोडल्या जातात. आंतरजिल्हा, जिल्हा अंतर्गत तसेच हैदराबाद, पणजी येथे एसटी सुरू केली आहे. पण कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असल्याने प्रवासी घरातच बसून आहेत. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत म्हणावे त्या प्रमाणात भरणा झालेला पाहायला मिळत नाही.

चौकट

उत्पन्नात फरक पडेना

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने सातारा जिल्ह्यातील प्रमुख शहरांना जोडले असून राज्यातील प्रमुख शहरांतही एसटी धावत आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी सोडण्याचा संकल्प केला आहे. तरी निम्मे प्रवासी वाहतुकीलाच अधिकृत परवानगी असल्याने उत्पन्नात फारसा फरक पडत नाही. त्यामुळे अडचणीत वाढ होत आहे.

चौकट

दुसऱ्या राज्यातील प्रवासी मिळेनात

सातारा जिल्ह्यातून हैदराबाद, पणजी येथे एसटी सुरू केली आहे. ही सुरू करताना प्रवाशांच्या सोयीच्या वेळेचाही विचार महामंडळाने केला आहे.

nगोव्याला शक्यतो पर्यटनासाठीच लोक जात असतात. तेथे फारसे निर्बंधही नाहीत. तरीही अजूनही लोकांची घरातून बाहेर पडण्याची मानसिकता नसल्याचे दिसत असून प्रवासी मिळत नाहीत.

चौकट

ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देण्याची गरज

nएसटी महामंडळाने जादा उत्पन्न देणाऱ्या पुणे, मुंबई, बोरिवली, मुंबईकडे जास्त लक्ष दिले आहे.

nसातारा शहरात दररोज विविध कामानिमित्ताने ग्रामीण भागातून लोक येत असतात.

nत्यांचा विचार करुन सातारा शहर तसेच विभागातील अकरा आगारातून ग्रामीण भागाकडेही विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

nशाळा, महाविद्यालये बंद असले तरी शिक्षकांना, नोकरदारांना सकाळी कामावर जावेच लागते.

nत्यामुळे प्रमुख बसस्थानकातून ग्रामीण भागात सकाळी एसटी सुरू केल्यास निश्चित प्रवासी वाढतील.

चौकट

मुंबई, पुणे मार्गावर वाढली प्रवाशांची गर्दी

सातारा जिल्ह्याच्या तुलनेत मुंबई, पुणे येथे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. मृत्यूदरही कमी आहे.

यामुळे या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातारकरांची वर्दळ वाढली आहे. त्याचा फायदा होतो.

एकापाठोपाठ एक गाडी सोडण्याचे नियोजन केल्याने ऑनलाईन आरक्षणापेक्षा जागेवर येऊन प्रवास करणे पसंत करत आहेत.

Web Title: ST's 'border violation'; Travelers stay at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.