‘टिळक’मधील विद्यार्थी रोबोटिक, थ्रीडीत अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 10:49 PM2018-08-02T22:49:02+5:302018-08-02T22:49:06+5:30

Student Robotics in Tilak; | ‘टिळक’मधील विद्यार्थी रोबोटिक, थ्रीडीत अग्रेसर

‘टिळक’मधील विद्यार्थी रोबोटिक, थ्रीडीत अग्रेसर

Next

संतोष गुरव।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : दिवंगत यशवंतराव चव्हाण व आॅलिम्पिक पदक विजेते पैलवान दिवंगत खाशाबा जाधव यांच्यासारख्या प्रभावीशाली व्यक्तींनी ज्या शाळेत शिक्षण घेतले ती शाळा म्हणून शिक्षण मंडळ कºहाडच्या टिळक हायस्कूलला ओळखले जाते. या शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर ‘रोबोटिक’ अन् ‘थ्रीडी प्रिंटर’चे प्रभावीशाली शिक्षण दिले जाते. या शाळेतील विद्यार्थी हे नासा तसेच इस्त्रोमध्येही कार्यरत आहेत.
कºहाड शहराच्या मध्यवर्ती भागात १ आॅगस्ट १९२१ मध्ये लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ शिक्षण मंडळ कºहाडच्या टिळक हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेची स्थापना झाली. टिळक हायस्कूलमध्ये आजही शालेय अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना कला, मैदानी खेळ व साहसी खेळ, अभिनय, गायन, वादन, नृत्य, जीवन कौशल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाण घडवून देणारे असे विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन केले जाते.
आर्चरी, जलतरण, सॉफ्टबॉल, क्रिकेट, तायक्वांदो तसेच पारंपरिक कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स या खेळाचे विशेष प्रशिक्षण शाळेतर्फे दिले जाते. शाळेतील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्पर्धामध्ये विजय मिळविला आहे.
‘अटक टिकरिंग’ अनुदान प्राप्त जिल्ह्यातील पहिली शाळा
शिक्षण मंडळ कºहाडची टिळक हायस्कूल ही केंद्रशासन पुरस्कृत ‘अटल टिकरिंंग लॅब’साठी अनुदान प्राप्त झालेली सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा आहे. या अटलच्या माध्यमातून शाळेस २०१६-१७ या वर्षी वीस लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून शाळेत रोबोटिक व थ्रीडी प्रिंटर आदींसह यंत्रमानव निर्मितीचे विद्यार्थ्यांना आकर्षक लॅबच्या माध्यमातून प्रशिक्षण व शिक्षण दिले जाते.
नामवंत माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
टिळक हायस्कूलमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आॅलिम्पिक पदक विजेते दिवंगत खाशाबा जाधव, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, आमदार बाळासाहेब पाटील, वि. स. पागे आदींनी या टिळक हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे.

Web Title: Student Robotics in Tilak;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.