प्रश्नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:14+5:302021-07-02T04:26:14+5:30
कऱ्हाड : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र कनिष्ठ विभाग कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा मराठी ...
कऱ्हाड : छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यशास्त्र कनिष्ठ विभाग कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धा मराठी व इंग्रजी भाषेत घेण्यात आली. या स्पर्धा कार्याध्यक्ष प्रा. संजय सुतार, प्रा. अविनाश यमगर, समन्वयक श्याम दुसाणे, प्रा. राम बागुल, गिरीश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. त्यामध्ये राज्यातून अकरावी व बारावीच्या सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रा. सुमित पवार, उपाध्यक्ष प्रा. सुरेश नारायणे, शरद जोगे, सचिव प्रा. पितांबर उरकुडे, कोषाध्यक्ष प्रा. स्मिता जयकर, सहसचिव प्रा. सुनील राठोड आदींनी सहकार्य केले.
तांबवे येथे जयंत पाटील यांचा सत्कार
तांबवे : तांबवे, ता. कऱ्हाड येथे लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, ज्योतीराम चव्हाण, भगवान पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
वाल्मीकी विद्यालयात सेवागौरव उत्साहात
तळमावले : येथील वाल्मीकी विद्यालयातील प्रभाकर बाबर व उमा बाबर यांचा सेवागौरव कार्यक्रम झाला. सेवानिवृत्तीनिमित्त बाबर यांनी एक लाख देणगी देऊन वाल्मीकी विद्यालयाच्या पठारावर वनराई फुलवली आहे. संस्थेचे माजी सहसचिव एस. के. कुंभार, आर. के. भोसले, पंचायत समिती उपसभापती रमेश देशमुख, मुख्याध्यापक अशोक माने, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन ताईगडे, उपसरपंच अंकुश आतकरी, महादेव पानवळ, माजी पंचायत समिती सदस्य बाबासाहेब बोत्रे, आनंदराव माने, अण्णासाहेब सुतार आदी उपस्थित होते.