विद्यापीठ-कॉलेजच्या विसंवादात विद्यार्थ्यांचा ‘निकाल’

By admin | Published: January 30, 2015 10:39 PM2015-01-30T22:39:35+5:302015-01-30T23:13:21+5:30

रक्तदाब वाढला : कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रथम सत्राचा निकाल जाहीर न झाल्याने तेराशे विद्यार्थी लटकले

Students' result in university scholarship | विद्यापीठ-कॉलेजच्या विसंवादात विद्यार्थ्यांचा ‘निकाल’

विद्यापीठ-कॉलेजच्या विसंवादात विद्यार्थ्यांचा ‘निकाल’

Next

संजय पाटील - कऱ्हाड -शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांचा प्रथम सत्राचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर झालाय; फक्त कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल अद्याप लागलेला नाही. या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवण्यात आल्याचे कारण विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना दिल जातंय, तर यामध्ये आमची काहीच चूक नाही, असं महाविद्यालय व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. विद्यापीठ व कॉलेजच्या या ओढाताणीत विद्यार्थी मात्र लटकलेत.
कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध शाखांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व अखेरच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे १ हजार ३०० आहे. या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा १७ ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान संपली आहे. साधारणपणे परीक्षा संपल्यानंतर ४५ दिवसांंत शिवाजी विद्यापीठाकडून सर्वच महाविद्यालयांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व अखेरच्या वर्षाचा, प्रत्येक शाखेचा निकाल ‘आॅनलाईन’ जाहीर केला जातो. (पान ७ वर)


विद्यार्थी चोवीस तास ‘आॅनलाईन’
कऱ्हाडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या जवळपास सर्वच विद्यार्थ्यांकडे ‘स्मार्टफोन’ आहेत. सर्वच विद्यार्थी सध्या प्रथम सत्राचा निकाल जाहीर झालाय का, हे पाहण्यासाठी चोवीस तास ‘आॅनलाईन’ राहत आहेत. प्रत्येक तासाला ते विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट तपासून खातरजमा करीत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी त्यांची निराशाच होत आहे.


प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्याचे कारण देऊन विद्यापीठाने आमच्या महाविद्यालयाचा प्रथम सत्राचा निकाल अडवून ठेवला आहे. विद्यापीठाशी आमचा त्याबाबत पत्रव्यवहार झाला असून, प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले होते, हे आम्ही विद्यापीठाला कळविले आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्येही डिसेंबरमध्ये प्रथम सत्र संपल्यानंतर निर्धारित कालावधित सर्वच महाविद्यालयांचा निकाल जाहीर झाला. मात्र, कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता त्यांना विद्यापीठात चौकशी करण्याचा सल्ला देण्यात आला. विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात चौकशी केली. त्यावेळी ‘तुमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नसल्यामुळे निकाल राखून ठेवलाय,’ असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी पुन्हा महाविद्यालय व्यवस्थापनाला याबाबत विचारले. मात्र, निकालाबाबत विद्यापीठाकडे पत्रव्यवहार सुरू असल्याचे महाविद्यालयाकडून आता सांगण्यात येत आहे.
महाविद्यालय व विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या या ओढाताणीमुळे विद्यार्थी हतबल झाले असून, पहिल्या सत्राचा निकाल जाहीर होण्यासच विलंब झाल्यामुळे दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. या वादावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचा निकाल तातडीने जाहीर करण्यात यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.त्याचे पुरावेही दिलेत. निकाल त्वरित जाहीर व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे.
- पी. एम. खोडके, प्राचार्य, अभियांत्रिकी महाविद्यालय, कऱ्हाड

Web Title: Students' result in university scholarship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.