शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक, चालकाचे पलायन: सातारा पोलिसांकडून शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 04:42 PM2017-12-08T16:42:41+5:302017-12-08T16:45:42+5:30

शाळेत निघालेल्या दोन विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक बसल्याने दोघेही विद्यार्थी जखमी झाले. या अपघातानंतर लोक मारहाण करतील, या भीतीपोटी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील सातारा जिल्हा परिषद परिसरात घडली.

Students rushed to the rickshaw, driver's escape: Satara police started searching | शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक, चालकाचे पलायन: सातारा पोलिसांकडून शोध सुरू

शाळेत निघालेल्या विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक, चालकाचे पलायन: सातारा पोलिसांकडून शोध सुरू

Next
ठळक मुद्देभीतीपोटी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पलायन खासगी दवाखान्यात दोन्ही मुलांना दाखल

सातारा : शाळेत निघालेल्या दोन विद्यार्थ्यांना रिक्षाची धडक बसल्याने दोघेही विद्यार्थी जखमी झाले. या अपघातानंतर लोक मारहाण करतील, या भीतीपोटी रिक्षाचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील जिल्हा परिषद परिसरात घडली.


शासकीय विश्रामगृह परिसरातून दोन मुले चालत शाळेत निघाली होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांना धडक दिली. दोघेही विद्यार्थी खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या हाताला आणि पायाला जखम झाली. दोघांचेही दप्तर बाजूला पडले. त्यामुळे दप्तरमधील वह्या व इतर साहित्य इतरत्र पडले.

हा प्रकार तेथून जाणाऱ्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लोक येत असल्याचे पाहून रिक्षाचालकाने भीतीने पलायन केले. जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांना नागरिकांनी फोन करून या अपघाताची माहिती दिली. त्यांचे पालक येर्ईपर्यंत काही युवकांनी जवळच असलेल्या एका खासगी दवाखान्यात दोन्ही मुलांना दाखल केले. पळून गेलेल्या रिक्षाचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.

Web Title: Students rushed to the rickshaw, driver's escape: Satara police started searching

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.