‘एसईएमएसच्या विद्यार्थ्यांनी जप्त केलं घरातलं प्लास्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:59 PM2019-10-01T23:59:03+5:302019-10-02T00:07:06+5:30

कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणाºया काळ्या रंगाच्या पातळ पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आहेत. या पिशव्या हल्ली दुकानातच नव्हे, तर रस्त्यावरील विक्रेत्यांकडे सर्रास मिळतात. कारवाईच्या धाकाने पिशव्या बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले.

Students seized plastic from home | ‘एसईएमएसच्या विद्यार्थ्यांनी जप्त केलं घरातलं प्लास्टिक

सातारा येथील सातारा इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थिनींकडून प्लास्टिक पुनर्प्रक्रि येसाठी पाठविण्यात आले.

Next
ठळक मुद्देलोकमत विशेष...घरातूनच नव्हे तर आता मनातूनही बाहेर काढण्याचा संकल्पविद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीचे संस्कार रुजवण्यासाठी सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मिथिला गुजर यांनी प्लास्टिक विरोधी उपक्रम हाती घेतला.

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : पर्यावरण तसेच माणसं, जनावरांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांना केवळ घरातूनच नव्हे तर मनातून बाहेर काढण्याचा चंग सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बांधला आहे. त्याचा एक कृतिशील भाग म्हणून हे विद्यार्थी आपल्या घरात आढळणाºया प्लास्टिक पिशव्या जप्त करून शाळेत एकत्र गोळा करतात. नंतर हे प्लास्टिक रिसायकलसाठी देण्यात येणार आहे. प्लास्टिक विरोधी विचार विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच रुजविण्याच्या शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे शहरात कौतुक होत आहे.

प्लास्टिकच्या वापराचे पर्यावरणीय व आरोग्यविषयक दुष्परिणाम दृश्य स्वरुपात दिसू लागले आहेत. प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी बºयाच घोषणा झाल्या. वापरून झालेल्या दुधाच्या पिशव्या पुन्हा दुकानदाराला परत दिल्यास अमूक पैशांचा परतावा, दुधाच्या पिशव्यांना काचेच्या बाटलीचा पर्याय, किराणा मालाच्या दुकानदारांची अडचण दूर करण्यासाठी नियमात दिलेली सूट असे अनेक प्रकार दोन वर्षांत पाहायला मिळाले; पण यातून काहीही निष्पन्न झाले नाही. लोक सुरुवातीला घरातून कापडी पिशव्या घेऊन जायचे; पण थोड्याच दिवसांत दुकानदारच प्लास्टिक पिशव्यांमधून माल देऊ लागले.

कचरा टाकण्यासाठी वापरल्या जाणा-या काळ्या रंगाच्या पातळ पिशव्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आहेत. या पिशव्या हल्ली दुकानातच नव्हे, तर रस्त्यावरील विक्रेत्यांकडे सर्रास मिळतात. कारवाईच्या धाकाने पिशव्या बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले. सुरुवातीच्या कारवाईचा उत्साह आटला असून, फूटपाथवरील फेरीवाल्यापासून दुकानांपर्यंत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर पाहायला मिळतो. लोकही त्याच पिशव्या वापरू लागले.

विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्तीचे संस्कार रुजवण्यासाठी सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मिथिला गुजर यांनी प्लास्टिक विरोधी उपक्रम हाती घेतला. यामध्ये इयत्ता पाचवी ते नववीमधील सुमारे सव्वाचारशे विद्यार्थी सहभागी झाले. मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांनी नुकतेच प्लास्टिकच्या दुष्परिणामांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर या उपक्रमाला स्कूलमध्ये सुरुवात झाली.

प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे होणारा वाढता कचरा आणि प्रदूषण तसेच आरोग्यावरील दुष्परिणाम पाहता प्लास्टिक प्रतिबंधाच्या या उपक्रमातून स्वच्छतेची संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. घरात ठिकठिकाणी आढळून येणाºया प्लास्टिक पिशव्या गोळा करून त्या शाळेत आणून देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा लागली आहे.

 

घरातील किचनमध्ये आढळणाऱ्या, बेडखाली दडपून ठेवलेल्या प्लास्टिक पिशव्या विद्यार्थी काढून घेतात. नंतर साठलेल्या पिशव्या महिन्यातून एकदा शाळेत जमा केल्या जातात. हे प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहे. सर्वाधिक प्लास्टिक गोळा करणाºया विद्यार्थ्यांचे शाळेकडून कौतुक करण्यात येते.
- मिथिला गुजर, मुख्याध्यापिका, सातारा इंग्लिश मीडियम स्कूल


 


 


 

Web Title: Students seized plastic from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.