विद्यार्थ्यांनी चित्रातून दिला देशप्रेमाचा संदेश
By admin | Published: February 3, 2015 09:35 PM2015-02-03T21:35:29+5:302015-02-03T23:57:13+5:30
‘रंग दे’ चित्रकला स्पर्धा : उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा : ‘लोकमत बालविकास मंच’ने आयोजित केलेल्या ‘रंग दे’ चित्रकला स्पर्धेला बालचमूंनी प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास ३०० पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेकरिता वेगवेगळे वयोगट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र विषय दिले गेले. सहभागी विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयाला अनुसरून चित्र काढून रंग भरावयाचे होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपली कल्पनाशक्ती पणाला लावून एकापेक्षा एक सरस चित्रे रेखाटली आणि रंगसंगतीचा वापर करून चित्रे रंगवली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी चित्ररूपात धर्मनिरपेक्षतेचा, देशप्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिला. अनेक विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रातून निसर्गाच्या सुंदरतेचे रूप साकार केले. या स्पर्धेसाठी अण्णासाहेब राजेभोसले प्राथमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अजित साळुंखे आणि धनंजय भोसले यांनी सहकार्य केले. विजेत्यांना लवकरच बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेचा निकाल : लहान गट (छोटा गट ते दुसरी) : खुशी पुजारी (प्रथम), श्लोक माने (द्वितीय), शौर्या राठी (तृतीय), उदय धोंडगे (उत्तेजनार्थ). मध्यम गट (तिसरे ते पाचवी) : प्राजक्ता मुळे (प्रथम), पियुष बारटक्के (द्वितीय), कादंबरी गालिंदे (तृतीय), श्रावणी यादव (उत्तेनार्थ). मोठा गट (सहावी ते दहावी) : तेजस्विनी जाधव (प्रथम), मयुरी काळे (द्वितीय), संपदा कणसे (तृतीय), शुभम महाडवाले (उत्तेजनार्थ). (प्रतिनिधी)