विद्यार्थ्यांनी कलागुणांना वाव द्यावा

By Admin | Published: September 15, 2015 11:44 PM2015-09-15T23:44:45+5:302015-09-15T23:55:45+5:30

संजीव खडके : ‘अभिनव’चे उपक्रम कौतुकास्पद; विविध उपक्रमांनी ‘अभियंता दिन’ साजरा

Students should give rise to art skills | विद्यार्थ्यांनी कलागुणांना वाव द्यावा

विद्यार्थ्यांनी कलागुणांना वाव द्यावा

googlenewsNext

शिरवळ : ‘खेड्याकडे चला ही संकल्पना महत्त्वाची आहे. याबरोबरच नवनवीन संकल्पना निर्माण करुन ज्ञान जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कलागुणांना वाव देणे गरजेचे आहे. यासाठी आधुनिक इंजिनिअरिंगचे जनक सर विश्वेश्वरया यांचे स्मरण विद्यार्थ्यांनी करावे. अभिनव एज्युकेशन सोसायटी राबवित असलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन पुणे विभागीय सहकार आयुक्त संजीव खडके यांनी केले.
वडवाडी ता. खंडाळा येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेकनॉलॉजीमध्ये राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव जगताप, उपाध्यक्ष संजीव जगताप, ‘लोकमत’चे वरिष्ठ शाखाप्रमुख संतोष भोगशेट्टी , जाहिरात विभागाचे संतोष जाधव, सचिव सुनिता जगताप, विश्वस्त नानासाहेब ताकवले, कुमोदिनी ताकवले, विजय जाधव, विजय खुटवड, प्राचार्य प्रशांत पाटील, प्रा. डी. के. खोपडे, प्रा. डॉ. योगेश मलशेट्टी आदी उपस्थित होते.
यावेळी अभिनव मधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संजीव खडके व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजीव जगताप, प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यकत केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध उपकरणांचे मान्यवरांनी कौतुक केले.
प्राचार्य प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. पायल शिंदे, प्रा. प्राजक्ता पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोनाली मलशेट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Students should give rise to art skills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.