विद्यार्थ्यांना हवी सत्र परीक्षा : अभ्यासाशिवाय अन्य काहीच करता येत नसल्याची काहींची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:43 PM2018-04-17T23:43:30+5:302018-04-17T23:43:30+5:30
सातारा : अभ्यासाचा वाढणारा ताण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची होणारी घाई आणि अभ्यासाशिवाय अन्य काहीच न करता येण्याची विद्यार्थ्यांची हतबलता यामुळे मूल्यमापनासाठी वार्षिक
भोलेनाथ केवटे ।
सातारा : अभ्यासाचा वाढणारा ताण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची होणारी घाई आणि अभ्यासाशिवाय अन्य काहीच न करता येण्याची विद्यार्थ्यांची हतबलता यामुळे मूल्यमापनासाठी वार्षिक पध्दतीच ठेवावी, असा आग्रह महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये दिसून येत आहे.
सध्या प्रचलित असणाऱ्या, मूल्यमापनासाठी सतत वापरल्या जाणाºया पद्धती म्हणजे लेखी परीक्षा. या घेण्याच्या पद्धती म्हणजे सत्रपद्धती आणि वार्षिक पद्धती. अनेक उत्तम शैक्षणिक संस्था, परदेशी विद्यापीठे तसेच स्थानिक विद्यापीठे या सत्र पद्धतीचा अवलंब करतात. वर्षभरात सत्र पद्धतीने होणाºया दोन परीक्षेच्या नियोजनात शिक्षकांचा किमान ३० टक्क्यांहून अधिक वेळ जातो.
नागपूर येथे झालेल्या परिषदेत आणि शिवाजी विद्यापीठात झालेल्या मीटिंगमध्येही यासंदर्भात काही कुलगुरुंनी या सत्र पद्धतीचा मुद्दा मांडला. सत्र पद्धत सध्या उपयुक्त ठरत नाही. विद्यार्थी हा फक्त परीक्षार्थीच बनत चालला आहे, त्याला इतर कला-कौशल्यासाठी वेळ मिळत नाही, असे काही मुद्दे या परिषदेत मांडले गेले होते.या सत्रपद्धतीमुळे विद्यार्थ्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळही मिळत नसल्याचे मत काही शिक्षकांनी नोंदवले. सत्र पद्धत बरी का वार्षिक? या संभ्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.
वर्षभराचे अध्यापन कसेबसे पूर्ण
वर्षभरात किमान १८० दिवस अध्ययन, अध्यापन झालेच पाहिजे. प्रत्यक्षात ३६५ दिवसांचा हिशोब पाहिला तर उन्हाळी सुटी, दिवाळी सुटी, इतर सण, उत्सव, सार्वजनिक सुट्या आणि वर्षाचे रविवार यांची अंदाजे बेरीज १३५ दिवसतरी होते. ३६५ वजा १३५ बरोबर २३० दिवस आणि त्यामध्ये दोन्ही सत्रांत किमान ४०-४० दिवस (प्रत्यक्षात दोन महिने किंवा जास्त) आणि कसेबसे १५० दिवस प्रत्यक्ष कामकाजासाठी उरतात. त्यामध्ये पुन्हा गॅदरिंग, खेळांचे सामने आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा आदी कार्यक्रम याच दिवसांत असतात.
सत्र परीक्षा फायदे :
१. विद्यार्थी नियमित हजर राहतात.
१. विद्यार्थी नियमित अभ्यास करतात.
१. वर्षातून दोन परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यावर अभ्यासाचा मानसिक ताण येत नाही.
१. परीक्षांचे नियोजन आटोपशीर
होते.
सत्र परीक्षा तोटे :
१. अभ्यासासाठी वेळ मिळत नाही.
१. वेळखाऊ प्रक्रिया आहे.
१. इतर कौशल्यांसाठी वेळ देता येत नाही.
१. अन्य जबाबदाºयांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही.
सत्र पद्धतीमुळे अध्यापनाचे काम आटोक्यात येते. मात्र मुलांना इतर अॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येत नाही. यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो.
- प्रा. डॉ. ए. एस. पाटील
सत्र पद्धत ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जे शिकविणं अपेक्षित असतं त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. वेळ अपुरा असल्यामुळे अभ्यासक्रम शिकविताना अनेक अडचणी येतात.
- प्रा. डॉ. युन्नूस शेख
सत्र पद्धतीमुळे मला अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबींना वेळ देता येत नाही. वर्षातून एकदा परीक्षा घेतल्यास अभ्यासालाही वेळ मिळेल आणि मला खेळातही भाग घेता येईल.
- परशुराम कांबळे, विद्यार्थी
वार्षिक परीक्षेपेक्षा सत्र पद्धत खूप चांगली आहे. कारण, अभ्यास चांगला होतो. वार्षिक परीक्षेमुळे वर्षभर अभ्यास करता येत नाही आणि एकदमच अभ्यासाचा ताण येतो.
- अश्विनी भोसले, विद्यार्थिनी