छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र अभ्यासावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:24+5:302021-02-22T04:29:24+5:30
शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला जयंतीदिनी अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, कऱ्हाड दक्षिण ...
शहरातील दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला जयंतीदिनी अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, कऱ्हाड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजित गुजर, पै. नानासाहेब पाटील, शिवाजीराव मोहिते, विक्रांत जाधव, मोहनराव शिंगाडे, इंद्रजित चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोगलांकडून रयतेवर होणारे अन्याय, अत्याचार पाहून जनता यातून कशी बाहेर पडेल याचा राजमाता जिजाऊ सतत विचार करत होत्या. रयतेच्या कल्याणाचे स्वराज्य निर्माण करण्याचे संस्कार त्यांनी बाल शिवबाच्या मनावर बिंबवले. हाच राष्ट्रभक्तीचा अंगार शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांमध्ये पेटविला. त्यातून एक असामान्य व अलौकिक स्वराज्य साकारले गेले.
दरम्यान, यावेळी शिवकन्या ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. या ग्रुपमधील सदस्यांसोबत पृथ्वीराज चव्हाण यांनी संवाद साधला.
फोटो : २१केआरडी०४
कॅप्शन : कऱ्हाडच्या दत्त चौकात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह शिवकन्या ग्रुपच्या सदस्यांनी जयंतीदिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले.