विलगीकरणासाठी हॉटेल पालिकेच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:31 AM2021-04-29T04:31:37+5:302021-04-29T04:31:37+5:30

महाबळेश्वर : येथील ज्येष्ठ नगरसेविका विमल पारठे यांनी त्यांचे हाॅटेल कोरोनाबाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी मोफत देण्यासाठी पालिकेच्या स्वाधीन केले. याच ...

Subject to hotel municipality for segregation | विलगीकरणासाठी हॉटेल पालिकेच्या स्वाधीन

विलगीकरणासाठी हॉटेल पालिकेच्या स्वाधीन

Next

महाबळेश्वर : येथील ज्येष्ठ नगरसेविका विमल पारठे यांनी त्यांचे हाॅटेल कोरोनाबाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी मोफत देण्यासाठी पालिकेच्या स्वाधीन केले. याच विलगीकरण कक्षात दाखल रुग्णांच्या नाश्ता, चहा व दोन वेळच्या जेवणाची सोय नगरसेवक रवींद्र कुंभारदरे मोफत करणार आहेत.

कोरोनाचे रुग्ण भरमसाट वाढू लागले आहेत. येथील लहान घरे असलेल्या कुटुंबातील नागरिकांला लागण झाली तर त्यांची घरात स्वतंत्र सोय करणे शक्य होत नाही. लक्षणे नसलेल्या व विलगीकरणाची घरी गैरसोय असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी नगराध्यक्षांनी विलगीकरणाची सोय केली होती. परंतु या कक्षात दाखल होण्यासाठी पाच हजार रुपये भरावे लागणार होते. लाॅकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद आहेत, अशा स्थितीत विलगीकरण कक्षासाठी पाच हजार रुपये भरणे कठीण होणार असल्याने अशा कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी येथील नगरसेविका यांनी विलगीकरणासाठी संपूर्ण हाॅटेल पालिकेच्या स्वाधीन केले आहे.

संबंधित हाॅटेलमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यापूर्वी तेथे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत याची मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेविका विमलताई पारठे, शारदा ढाणक, स्नेहल जंगम, नगरसेवक संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, संजय पिसाळ, संजय जंगम, रोहित ढेबे, संदीप मोरे, अनिकेत रिंगे उपस्थित होते. दरम्यान, हाॅटेलमध्ये दोन दिवसात विलगीकरण कक्षाचा प्रारंभ करणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली.

विलगीकरणासाठी नगरसेविका विमल पारठे यांनी हाॅटेल मोफत दिल्याचे पाहून विलगीकरण कक्षात दाखल होणारे कोरोनाबाधित रुग्णांची नाश्ता, चहा व जेवणाची मोफत सोय करण्याचे नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: Subject to hotel municipality for segregation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.