हद्दवाढ भागासाठी भरीव तरतूद - उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:42 AM2021-08-22T04:42:05+5:302021-08-22T04:42:05+5:30

सातारा सातारा नगरपरिषदेच्या होणाऱ्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये नवीन हद्दवाढ क्षेत्रामधील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात ...

Substantial provision for boundary extension area - Udayan Raje Bhosale | हद्दवाढ भागासाठी भरीव तरतूद - उदयनराजे भोसले

हद्दवाढ भागासाठी भरीव तरतूद - उदयनराजे भोसले

Next

सातारा

सातारा नगरपरिषदेच्या होणाऱ्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये नवीन हद्दवाढ क्षेत्रामधील विविध विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन हद्दवाढ क्षेत्र व मूळ क्षेत्र याचा समयोचित समन्वय साधून दोन्ही भागातील विविध कामांसाठी भरीव निधीची तरतूद करुन, सातारा विकास आघाडी सातारकरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करीत असल्याचे, खासदार उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.

गेली दीड वर्षे कोरोनाच्या हाहा:काराने संपूर्ण जग ग्रासले आहे. त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांनाही मोठया प्रमाणावर बसला आहे. या कालखंडामध्ये शासकीय निधी, करवसुली याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला तरी सुद्धा सातारा नगरपरिषदेने नागरीकांच्या हिताला सर्वोच्य प्राधान्य देत नागरीकांच्या गरजा सोडविण्यावर भर दिल्याचेही उदयनराजे यांनी पत्रकात म्हटले आहे.

सातारा नगरपरिषदेची स्थायी समितीची सभा २७ ऑगस्ट रोजी होत आहे. या सभेमध्ये शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, खेड, पिरवाडी, विसावा नाका परिसर, शाहुपूरी, दरे इत्यादी हद्दवाढ क्षेत्रामधील भागाकरीता भरीव तरतूद करुन तेथील अत्यावश्यक विषय सभेमध्ये निर्णय घेऊन तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विलासपूर आणि शाहूनगर, शाहुपूरी आणि गेंडामाळ हुतात्मा उद्यान आणि खेड हद्दीतील नागरीकांना बसण्यासाठी स्टील बेंचेस उपलब्ध करुन देणे, शाहुनगर कृष्णा कॉलनी येथे सुमारे ४ लाख ७७ हजाराचे रस्ता डांबरीकरण, शाहुपूरी करंजे तर्फ सातारा सैनिकी मुलांचे वसतीगृह येथे सुमारे १० लाख रुपयांचे अतिथीगृह बांधणेचे काम विचाराधीन आहे.

गेंडामाळ येथील फाशीचा वड येथे सुमारे ३ लाखांची विविध स्थापत्य कामे करणे, करंजे नाका येथे प्रवेशव्दार कमान बांधणे, करंजे नाका येथे

बसस्टॉप उभारणे, गोडोली जकात नाका ते अजंठा हॉटेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या ओढयाच्या पुलास संरक्षक फेन्सिंग करणे, अजिंक्यतारा किल्ला

रस्ता व चारभिंती रस्ता लगत धोक्याचे वळणावर फेन्सींग करणे आदी विकासकामे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तर दि. ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये सातारा नगरपरिषदेच्या जुन्या हद्दीतील तिसरी सुधारित विकास योजना तयार करणे आणि नवीन हद्दवाढ

भागाकरीता विकास योजना तयार करणे, भुयारी गटर योजनेचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

हद्दवाढ भागासाठी नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) तयार केला जाणार आहे. त्याचे माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प हद्दवाढ व शहरामध्ये राबविले जाणार आहेत. सातारा हे ऐतिहासिक शहर आहेच, परंतु त्याचे स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणेस मदत होणार आहे. त्याचबरोबर या भागात असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना नगरपरिषदेमार्फत मदत केली जाणार आहे.

चौकट

अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी रिटेनिंग वॉल बांधण्याचा प्रस्ताव

सर्वांत महत्वाचे म्हणजे सध्या राज्यात पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सातारा शहर व शाहुनगर या भागात भविष्यात संभाव्य घेका लक्षात घेता, अजिंक्यतारा पायथालगत रहिवाशी भागाकरीता रिटेनिंग वॉल, विसर्गमार्ग, ओढे-नाले यांची बळकटी करणे, याकामी प्रकल्प अहवाल तयर केला जाणार आहे.

शाहूनगर भागातील नागरीकांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी या भागात पाणीपुरवठा योजना, म.जी. प्रा. यांचेकडून करणेसाठी त्यांना ना हरकत प्रमाणपत्रा दिले जाणार आहे. त्याच बरोबर हद्दवाढ क्षेत्राामध्ये नवीन प्रस्तावित भुयारी गटर योजना राबविली जाणार आहे.

सातारा विकास आघाडीने गेल्या साडेचार वर्षात सातारा शहरामध्ये ग्रेड सेपरेटर, भुयारी गटर, नवीन प्रशासकीय इमारत, पंतप्रधान आवास योजना, कास धरण उंची वाढवणे, बागांचे नुतनीकरण इत्यादी महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून पूर्णत्वास नेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाठपुरावा करुन झालेल्या हद्दवाढीतील क्षेत्रासाठी विशेष निधीची तरतूद सातारा नगरपरिषदेमध्ये केल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Substantial provision for boundary extension area - Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.