पार्लेच्या तनया नलवडेचे संचलनात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:24+5:302021-02-15T04:34:24+5:30

कऱ्हाड : दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या संचलनात पार्ले (ता. कऱ्हाड) येथील तनया नलवडे हिने नवोदल विभागाच्यावतीने ...

Success in operation of Tanya Nalwade of Parle | पार्लेच्या तनया नलवडेचे संचलनात यश

पार्लेच्या तनया नलवडेचे संचलनात यश

googlenewsNext

कऱ्हाड : दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या संचलनात पार्ले (ता. कऱ्हाड) येथील तनया नलवडे हिने नवोदल विभागाच्यावतीने द्वितीय क्रमांक मिळविला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे राष्ट्रीय छात्र सेनेच्या संचलन शिबिरात महाराष्ट्राने छाप पाडली आहे. पार्लेच्या तनया नलवडे हिला उपविजेते पदाचा मान मिळाला. पुणे येथील मॉडर्न महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी असून, या यशाबद्दल तनयाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विद्यानगर येथे गतिरोधकाची गरज

कऱ्हाड : विद्यानगर-सैदापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी भरधाव वेगात दुचाकी चालवताना आढळून येतात. या भरधाव दुचाकीमुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडतात. हे टाळण्यासाठी कृष्णा कॅनॉल ते बनवडी फाट्यापर्यंत ठिकठिकाणी गतिरोधक निर्माण करणे गरजेचे आहे. फार्मसी कॉलेज, अभियांत्रिकी महाविद्यालय, गाडगे महाराज महाविद्यालय, वेणूताई चव्हाण महाविद्यालय येथे गतिरोधक निर्माण केल्यास अपघातांचे प्रमाण कमी करणे शक्य होईल.

कऱ्हाडात जखमी श्वानाला जीवदान

कऱ्हाड : शहरातील सोमवार पेठेत गटारमध्ये अडकून जखमी झालेल्या श्वानाला पालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे जीवदान मिळाले. सोमवार पेठेतील गटारमध्ये अन्नाच्या शोधात गेलेले श्वान पाईपमध्ये अडकले. ते तेथून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असताना जखमी झाले. याची माहिती पालिकेचे मुकादम संजय लादे व अनिकेत वाघमारे यांना मिळाली. त्यांनी त्याठिकाणी जाऊन जखमी श्वानाला गटारमधून बाहेर काढले. तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. डॉ. मनोज शेडगे यांनी जखमी श्वानाची तपासणी करून औषधोपचार केले.

करपेवाडीच्या सरपंचपदी रमेश नावडकर

तळमावले : करपेवाडी (ता. पाटण) येथे नुकतीच सरपंच, उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. रमेश नावडकर यांची सरपंचपदी, तर अर्चना करपे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी सदस्या पुष्पा साळुंखे, छाया करपे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. योगेश पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता करपेवाडीत आणल्याबद्दल पाटणकर यांच्यासह नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

पालकमंत्र्यांची यशवंत सोसायटीला भेट

कऱ्हाड : मलकापूर येथील यशवंत हौसिंग सोसायटीला सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अ‍ॅड. शिवाजीराव शिंदे, संस्थेचे संचालक विनायक पाटील, उपाध्यक्ष शांता पारखे, संचालक अशोक कराळे, आत्माराम काटकर, आदित्य शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी सोसायटीचे कार्य चांगले चालले असून ही सोसायटी आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार काढले.

Web Title: Success in operation of Tanya Nalwade of Parle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.