बालवैज्ञानिक स्पर्धेत स्टार इंग्लिश स्कूलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:34 AM2021-02-15T04:34:11+5:302021-02-15T04:34:11+5:30

मळाईदेवी शिक्षणसंस्था संचलित आयएसओ मानांकित स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी नेहमीच विविध क्षेत्रात अग्रेसर असतात. ...

Success of Star English School in Pediatric Competition | बालवैज्ञानिक स्पर्धेत स्टार इंग्लिश स्कूलचे यश

बालवैज्ञानिक स्पर्धेत स्टार इंग्लिश स्कूलचे यश

Next

मळाईदेवी शिक्षणसंस्था संचलित आयएसओ मानांकित स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी नेहमीच विविध क्षेत्रात अग्रेसर असतात. नुकत्याच झालेल्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत देवयानी रणजीत थोरात या विद्यार्थिनीने सहभाग घेतला होता. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिने या स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले. त्याचबरोबर श्रावणी शिवदास खाडे, अन्विता छपरे, सिद्धांत धाईंजे हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या स्पर्धेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ. रामचंद्र जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कॉलेजच्या विभागप्रमुख स्वाती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, अध्यक्ष पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष भास्करराव पाटील, खजिनदार तुळशीराम शिर्के, संचालक वसंतराव चव्हाण, संजय थोरात, स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या को-ऑर्डिनेटर डॉ. स्वाती थोरात यांनीही विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

फोटो : १४केआरडी०२

कॅप्शन : मलकापूर येथील स्टार इंग्लिश मीडिअम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. रामचंद्र जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Success of Star English School in Pediatric Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.