सुधा मोरे यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:21+5:302021-03-30T04:22:21+5:30
....... दरे खुर्द पंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ सातारा : जावळी तालुक्यातील दरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ, तर उपसरपंचपदी ...
.......
दरे खुर्द पंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ
सातारा : जावळी तालुक्यातील दरे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कांताबाई धुमाळ, तर उपसरपंचपदी सयाजी माने यांची निवड झाली आहे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक साहेबराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. नूतन सरपंच, उपसरपंच यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक पवार व इतरांनी कौतुक केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रज्जाक शेख यांनी काम पाहिले.
.......
केंजळ येथील रस्ता दुरुस्तीची मागणी
वेळे : वाई तालुक्यातील केंजळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने वाई सुरूर रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाई यांना निवेदन देण्यात आले आहे. केंजळ फाटा वाई सुरूर रस्त्यावरून प्रवास करताना गावातील विद्यार्थी, ग्रामस्थ व महिलांना रस्ता ओलांडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या रस्त्यावर कायमच वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्यास वाहनांचा वेग कमी होऊन रस्ता ओलांडताना होणारे अपघात टाळता येतील, असे या निवेदनात म्हटले आहे. केंजळ ग्रामपंचायतीचे सरपंच मीलन गायकवाड, उपसरपंच अमोल कदम, सदस्य नीलेश जगताप व सामाजिक कार्यकर्ते जयंत येवले यांनी हे निवेदन दिले.
.......
इक्बाल काझी यांची निवड
सातारा : गुणवंत कामगार प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी इक्बाल काझी यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी जयंत देशपांडे, उपाध्यक्षपदी श्रद्धा करंदीकर, सरचिटणीसपदी महेंद्र पवार, खजिनदारपदी अमृत साळुंखे यांच्या निवडी करण्यात आल्या व रघुवीर आपटे, दिलीप चरेगावकर, गोपाळ खजुरे, अशोकराव जाधव, गजानन घाडगे, आदींनी नवीन कार्यकारिणी यांचे कौतुक केले.
.........