पारदर्शक कारभारामुळे श्रीराम पतसंस्थेची यशस्वी वाटचाल : पाटणकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:36 AM2021-02-12T04:36:41+5:302021-02-12T04:36:41+5:30
पाटण येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्ष विलासराव क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. ...
पाटण येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्ष विलासराव क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते.
विलासराव क्षीरसागर म्हणाले, सर्वांच्या सहकार्याने दिवसेंदिवस पतसंस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. कोरोनाच्या संकटामुळे अनेक आर्थिक संस्थांंना मोठा फटका बसला असताना, अशा बिकट परिस्थितीतही संस्थेने १ कोटी १ लाखांवर नफा मिळवला आहे. संस्थेच्या ६९ कोटी ६१ लाख ६८ हजारांहून अधिक ठेवी असून निर्धाराने वाटचाल करणाऱ्या या संस्थेला राज्यपातळीवर आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अॅड. अविनाश जानुगडे, अर्बन बँकेचे अध्यक्ष दिनकरराव घाडगे, दीपकसिंह पाटणकर, नगराध्यक्ष अजय कवडे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, दिलीपराव मोटे, अशोकराव देवकांत, शिवाजीराव जगताप, अॅड. प्रदीप पाटील, तात्यासाहेब गव्हाणे, अॅड. वाय. जे. गायकवाड, विजयसिंह पाटणकर आदींसह सर्व संचालक, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यवस्थापक लहू माने यांनी नोटीस वाचन केले. स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष विलासराव क्षीरसागर यांनी केले. उपाध्यक्ष हिंदुराव सुतार यांनी आभार मानले. (वा. प्र.)
फोटो : ११केआरडी०२
कॅप्शन :
पाटण येथे श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सचिव अमरसिंह पाटणकर यांचे भाषण झाले.