पश्चिम बंगालमध्ये सुडाचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:55+5:302021-05-06T04:41:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या हिंसाचारात त्रास भोगावा लागला आहे. या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातारा जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते निषेधाचे फलक घेऊन उभे होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, त्या राज्याचे राज्यात सुडाचे राजकारण चालू झालेले आहे की, ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचा खून करणे त्यांच्या घरांची जाळपोळ करणे त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत, ही लोकशाहीची हत्या आहे, त्याच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते राज्यात शांततामय निदर्शने करत आहेत. कोरोनाचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात येत आहे. लोकशाहीबद्दल आस्था असणारे सर्वसामान्य नागरिकही यात सहभागी झाले होते. या आंदोलनाची आणि निषेधाची दखल घेऊन केंद्र सरकारपर्यंत आमच्या मागण्या पोहोचवाव्यात आणि पश्चिम बंगालमधील दंगेखोर व अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, विठ्ठल बलशेटवार, विकास गोसावी व इतर कार्यकर्त्यांनी आताच निषेधाचे फलक घेऊन आंदोलन केले. (छाया : जावेद खान)
05javed