सुधन्वाचे घर साताऱ्यातील करंजे पेठेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 06:53 AM2018-08-11T06:53:37+5:302018-08-11T06:53:45+5:30
मुंबईच्या नालासोपा-यात स्फोटकाप्रकरणी एटीएसने अटक केलेला सुधन्वा गोंधळेकर हा साता-याचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची पार्श्वभूमी शोधण्यासाठी सातारा पोलीस कामाला लागले आहेत.
सातारा : मुंबईच्या नालासोपा-यात स्फोटकाप्रकरणी एटीएसने अटक केलेला सुधन्वा गोंधळेकर हा साता-याचा असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याची पार्श्वभूमी शोधण्यासाठी सातारा पोलीस कामाला लागले आहेत.
सातारा शहरातील करंजे परिसरात असलेल्या झेंडा चौकात सुधन्वाचे घर असून, या ठिकाणी त्याचे आई, वडील, पत्नी अन् दोन छोट्या मुली राहतात. त्याचे वडील सेवानिवृत्त बँक अधिकारी असून, आई गृहिणी आहे. अलीकडे तो कामानिमित्त मुंबईत गेल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, तो नेमका काय करायचा, हे साताºयात कोणालाच ठाऊक नव्हते.
दरम्यान, ‘सनातन’शी संबंधित त्याची एक पोस्ट शुक्रवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘सातारा येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुधन्वा गोंधळेकर यांच्या आजी आणि दोन मुली जन्म मृत्यूच्या फेºयातून मुक्त’ या मथळ््याखाली वेगळीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘श्रीमती यमुनाताई डोंगरे यांनी ६३ टक्के तर कुमारी सई (८ वर्षे) आणि कुमारी सौम्या (५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी,’ असेही लिहिले गेले आहे.
तसेच हिंदू जनजागृती समितीचा उल्लेख असलेल्या एका पोस्टमध्ये या सुधन्वाच्या फोटोसह मजकूर दिसत आहे. ‘प्रत्येक हिंदू के लिए घर मे न्यूनतम स्वसंरक्षण हेतू कानून के दृष्टी से वैध शस्त्र रखकर समय पडनेपर उसका उपयोग करने का समय आ गया है! श्री. सुधन्वा गोंधळेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,’ असे यात म्हटले आहे.