सहकार चळवळीच्या हुंकाराचा प्रत्यय : जगदाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:49+5:302021-01-02T04:55:49+5:30
पाचवड : ‘साखर कारखानदारीतील सहकाराचा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून विस्तार होत आहे. या विस्ताराला विशेष गती देण्यासोबत त्याचा व्यापक उद्देश ...
पाचवड : ‘साखर कारखानदारीतील सहकाराचा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून विस्तार होत आहे. या विस्ताराला विशेष गती देण्यासोबत त्याचा व्यापक उद्देश कसा साधता येईल या वाटचालीत सहवीज निर्मिती प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरत आहेत. किसन वीर कारखाना येथील सहवीज निर्मिती प्रकल्प अशा प्रकल्पातील एक पथदर्शक प्रकल्प आहे. या ठिकाणी अपघाती मृत्यू पावलेल्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत म्हणजे सहकार चळवळीच्या उद्देशाचा हंकार आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय वनीकरण व ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव डी. डी. जगदाळे यांनी केले.
भुईंज येथील किसन वीर कारखाना येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याच्या अपघातात मृत पावलेल्या सात सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष मदन भोसले, सहवीज निर्मितीबाबत देशपातळीवर राबविण्यात येत असलेल्या धोरणावर चर्चा करण्यात आली. यावेळी साखर आयुक्त कार्यालयाचे सहसचिव संजय भोसले, साखर संघाचे कार्यकारी संचालक तथा संजय खताळ, मिटकॉनचे उपाध्यक्ष एस. सी. नातू, सहकार महर्षी शंकरराव मोहिते कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, राजारामबापू पाटील कारखान्याचे व्यवस्थापक एस. डी. कोरडे, मीनल वरे, श्रीकांत शिंदे, अलका पवार, महावीर पाटील, आर. एल. गुप्ता उपस्थित होते.
यावेळी शिवथर येथील मारुती भानुदास इंगवले, भादवडे (ता. खंडाळा) येथील अशोक बापू भोसले, मालगाव (ता. सातारा) येथील राजाराम दगडू बांदल, आरळे (ता. सातारा) येथील पद्मावती अर्जुन वाघमळे, कोरेगाव येथील गजानन राजाराम बर्गे, जांब (ता. वाई) येथील ज्ञानेश्वर गणपत मोहोळकर या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला. नंदकुमार निकम यांनी प्रास्ताविक केले. प्रभारी कार्यकारी संचालक अशोक शिंदे यांनी आभार मानले.