साखर कारखानदारीत राजकारण नको : रामराजे

By admin | Published: October 16, 2015 09:48 PM2015-10-16T21:48:13+5:302015-10-16T22:43:00+5:30

न्यू फलटण शुगर वर्क्स : मोळी पूजन कार्यक्रमात सर्वांचाच एकमेकांना सबुरीचा सल्ला

Sugar does not have politics in politics: Ramaraje | साखर कारखानदारीत राजकारण नको : रामराजे

साखर कारखानदारीत राजकारण नको : रामराजे

Next

साखरवाडी : ‘साखर उद्योगामध्ये राजकारण आणि अर्थकारण यांचे घातक समीकरण सुरू आहे. शासन-साखर कारखान्यांचे प्रश्न समजून घेणार नसेल तर केंद्र सरकारने आमच्यावर ‘एफआरपी’ची बंधने टाकू नयेत. आमचे आम्ही ठरवू, असे सांगतानाच फलटण तालुक्यातील साखर कारखाने टिकले पाहिजेत. यासाठी साखरवाडीच्या साखर कारखान्याबाबत मी कधी राजकारण केले नाही आणि करणारही नाही,’ असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. दरम्यान, यावेळी सर्वांनीच एकमेकांना सबुरीचा सल्ला दिला.
साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याच्या २०१५-१६ चा मोळी व गव्हाण पूजन कार्यक्रम रामराजे व उद्योगपती माधवराव आपटे यांच्या हस्ते झाला. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, कारखान्याचे संचालक महेश साळुंखे-पाटील, स्टेट बँकेचे डेप्यूटी जनरल मॅनेजर शेटी, रविरंजन प्रसाद, दत्त इंडिया प्रा. लि. चे जितेंद्र धारुशेठ, यतीन भाई, शंकरराव माडकर, सरपंच विक्रमसिंह भोसले, डी. के. पवार, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘सरकारने साखर कारखान्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याचा कहरच केला आहे, तो बदलला पाहिजे. त्यांनी कारखान्याचे प्रश्न समजून घेऊन कारखाने टिकले पाहिजेत, यासाठी धोरण आखले पाहिजे. सध्या उसाला एकरकमी दराची मागणी होऊ लागली असताना बँका कारखान्यांना एकरकमी दर देत नसल्याने ते शक्य नाही. ऊसउत्पादकांना योग्य दर मिळाला पाहिजे; परंतु तो मागताना भान ठेवले पाहिजे.’
यावेळी माणिक भोसले, मारुती माडकर, युनियनचे बाळासाहेब भोसले, केन सप्लायर्सचे दशरथ चोरमले, पोपट भोसले, बाळासाहेब खलाटे, श्रीहरी वाघ आदींसह शेतकरी, सप्लायर्स, कामगार उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील यांनी स्वागत केले. (वार्ताहर)

दिवाळीपूर्वी ‘एफआरपी’ची रक्कम : प्रल्हादराव साळुंखे-पाटील
प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी कारखान्याची गेल्या ८५ वर्षांतील चढ-उताराविषयी माहिती दिली. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धात्मक दर देणे क्रमप्राप्त असून, यासाठी कारखान्याचे विस्तारीकरण करून धाडसाने या हंगामात कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
ऊस उत्पादकांना ३०० रुपयांचे पेमेंट बँक खात्यावर जमा केले असून, ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यास आम्ही बांधील आहोत. याबाबत शेतकऱ्यांनी निश्चित राहावे. दिवाळीपूर्वी आम्ही ‘एफआरपी’ची रक्कम देणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Web Title: Sugar does not have politics in politics: Ramaraje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.