साखर कारखानदार, लोकप्रतिनिधींनी शासनाला योगदान द्यावे : खंडाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:44+5:302021-04-28T04:42:44+5:30

सातारा : राज्यातील सर्व आमदार, कारखानदार आणि सर्व संस्था यांनी पुढे येऊन योगदान द्यावे, अशी मागणी वंचित ...

Sugar manufacturers, people's representatives should contribute to the government: Khandait | साखर कारखानदार, लोकप्रतिनिधींनी शासनाला योगदान द्यावे : खंडाईत

साखर कारखानदार, लोकप्रतिनिधींनी शासनाला योगदान द्यावे : खंडाईत

Next

सातारा : राज्यातील सर्व आमदार, कारखानदार आणि सर्व संस्था यांनी पुढे येऊन योगदान द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

याप्रकरणी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ नियंत्रणात येताना दिसत नाही. यासाठी लाॅकडाऊनचा पर्याय निवडला, जनतेला वेठीस धरले, वेळप्रसंगी दंड वसूल केले, गुन्हे दाखल केले तरी जनता सहकार्य करत नाही, असा ठपका जनतेवर ठेवला जात आहे. याप्रकरणी जनतेलाच दोशी धरले जात आहे ही बाब फार गंभीर आहे.

राज्य शासनाने गेल्या १३ ते १४ महिन्यांत कोविड-१९च्या महामारीतून बाहेर काढण्यासाठी आपली आरोग्य सुविधा किती सक्षम केली तसेच आजच्या परिस्थितीत सर्वच आमदार यांनी प्रत्येक गोष्टीत शासनाकडे बोट दाखवून चालणार नाही. सर्व जनतेला आम्हीच तुमचे कर्तेधर्ते आहोत, असे भासवून करोडो रुपये खर्च करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचीही जनतेप्रति काही बांधीलकी आहेच की; पण तेच लोकप्रतिनिधी शासनाकडेच बोट दाखवत आहे. त्याकरिता मुख्यमंत्री यांनी सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये तातडीने आरोग्य सुविधा उभ्या करण्यामध्ये सहभागी होण्याच्या सक्त सूचना द्याव्यात तसेच कारखाने आणी नफेखोरी करणाऱ्या संस्था अडचणीत आल्या की शासनाच्या पॅकेजची अपेक्षा करतात तर आज शासन अडचणीत असताना त्यांना आरोग्य सुविधांच्या उभारणीत सहभागी होण्यासाठी सक्त सूचना शासनाने का देऊ नयेत आणि जे सहभागी होणार नाहीत, त्यांच्यावरसुद्धा कठोर कारवाई करण्याचा इशारा शासन का देत नाही ही बाब गंभीर आहे, याकडेही शासनाने कटाक्षाने लक्ष देण्याची मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Web Title: Sugar manufacturers, people's representatives should contribute to the government: Khandait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.