उमेदवारांची साखर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:31+5:302021-01-16T04:42:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान तारखेच्या एक दिवसापूर्वी आलेल्या संक्रांत सणाचे औचित्य साधत उमेदवारांनी ...

Sugar sowing of candidates | उमेदवारांची साखर पेरणी

उमेदवारांची साखर पेरणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपोडे बुद्रुक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदान तारखेच्या एक दिवसापूर्वी आलेल्या संक्रांत सणाचे औचित्य साधत उमेदवारांनी मतदारांमध्ये तीळगूळरूपी साखर पेरणी केली. काही ठिकाणी महिलांकडून वाण लुटण्यासाठी चिन्हातील वस्तूंचे वाटप केले.

मतदारांचा गोडवा वाढविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा नेमका किती फायदा त्या उमेदवारांना होणार याची प्रचिती उमेदवारांना प्रत्यक्ष निकालाच्या वेळी अनुभवयास मिळणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली असली तरी उमेदवारांच्या दृष्टीने प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा कालावधी संपेपर्यत मतदारांच्या हलचालींबाबत दक्ष राहावे लागते. शेवटच्या क्षणी घडणाऱ्या घडामोडींचा उमेदवाराच्या निकालावर प्रभाव पडत असतो. या काळात काही गैरमार्गांचा अवलंब होऊ नये यासाठीच निवडणूक यंत्रणेच्या वतीने प्रत्यक्ष निवडणुकीच्या पूर्वी काही तास प्रचारावर बंधन घातले जाते. या वेळी मात्र प्रत्यक्ष मतदान दिवसापूर्वी एक दिवस मकरसंक्रांत आली. त्याचे निमित्त साधत उमेदवारांनी तीळगूळरूपी साखरेचे वाटप करत मतदारांचा गोडवा वाढविला.

त्याचबरोबर ‘आपल्यालाच मतदान करून स्नेह वृद्धिंगत करावा,’ अशी विनवणी केली तर हा सण प्रामुख्याने महिलांचा असल्याने महिला उमेदवार व उमेदवारांच्या नातलग महिलांनी यानिमित्ताने वाण लुटण्यासाठी मतदानासाठी चिन्ह असलेल्या व वापरासाठी उपयुक्त असलेल्या विशेष वस्तूंचे वाटप केले.

यापूर्वीही तालुक्यातील उत्तर परिसरात काही विशेष सण, उत्सव व निवडणुका यांचा कालावधी याची गुंतागुंत झाली असली तरी परिसरातील नागरिकांनी त्यामध्येही योग्य आचरण करत परिसराचे वेगळेपण दाखवून दिले आहे.

मुख्यत: इतर निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतींचे निकाल हे काठावरचे असतात. काही ठिकाणी उमेदवारांना समान मतदान होते असाही अनुभव आहे. त्यामुळे या निवडणुकीत एकेक मतासाठी संघर्ष होत असतो. त्यामुळे या निवडणुकीदरम्यान वादविवाद होण्याची संभाव्यता असते. अलीकडील काळात त्याचे प्रमाण कमी झाले आहे.

Web Title: Sugar sowing of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.