ऊसाच्या शिवाराला लागलाय शेवंतीचा लळा, शेतकऱ्यांने २५ गुंठे क्षेत्रावर फुलवली बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 02:24 PM2021-07-03T14:24:46+5:302021-07-03T14:51:00+5:30

Agriculture Sector Satara : कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा आणि कोयना नदीचा भाग हा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. अशा या पट्यात काही शेतकरी बाजारपेठेत चांगली मागणी असलेल्या शेवंती जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये कोपर्डे हवेली, पाली, भिकेश्वर वडोली, हेळगाव या गावांचा समावेश असल्याने असेच म्हणावे लागेल ऊसाच्या शिवाराला शेवंतीचा लळा लागला आहे.

Sugarcane has been planted on the outskirts of sugarcane | ऊसाच्या शिवाराला लागलाय शेवंतीचा लळा, शेतकऱ्यांने २५ गुंठे क्षेत्रावर फुलवली बाग

ऊसाच्या शिवाराला लागलाय शेवंतीचा लळा, शेतकऱ्यांने २५ गुंठे क्षेत्रावर फुलवली बाग

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांने २५ गुंठे क्षेत्रावर फुलवली बागखर्च वजा करता सात लाखांचा नफा होण्याचा अंदाज

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा आणि कोयना नदीचा भाग हा ऊसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. अशा या पट्यात काही शेतकरी बाजारपेठेत चांगली मागणी असलेल्या शेवंती जातीच्या फुलाचे उत्पादन घेत आहेत. यामध्ये कोपर्डे हवेली, पाली, भिकेश्वर वडोली, हेळगाव या गावांचा समावेश असल्याने असेच म्हणावे लागेल ऊसाच्या शिवाराला शेवंतीचा लळा लागला आहे.

कोपर्डे हवेली येथील शेतकरी शुभम चव्हाण यांनी पंचवीस गुंठे क्षेत्रावर पुर्वा व्हाईट जातीच्या शेवंती फुलाची लागवड केली आहे. फुलाचे तोडे सुरू झाले आहेत. सध्या त्यांची फुले मुंबई येथील मिनाताई ठाकरे बाजार पेठेत जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी त्यांना एका किलोला १२० रुपये दर भेटत आहे. चार दिवसांला दोनशे किलोचा तोडा होत आहे.

चव्हाण यांनी २७ मार्चला शेवंतीच्या आठ हजार रोपांची लागण केली. त्यासाठी पाच ट्रेलर शेणखत घातले. शेताची मशागत करून पाच फुटी सरी सोडून मलचिंग आणि टिबकचा वापर केला. वेळोवेळी औषधाच्या फवारण्या घेतले वेगवेगळ्या पध्दतीची खते दिली त्यामुळे शेवंतीचे पीक जोमदार आले. रोपांची लागण केल्यापासून सत्तर दिवसांत फुलाचे तोडे सुरू झाले यासाठी चव्हाण यांना एक लाख रुपये उत्पन्न खर्च आला आहे. एका झाडाला सुमारे एक ते सव्वा किलो फुले मिळतील असा चव्हाण यांचा अंदाज आहे. सरासरी आठ टण फुलांची विक्री केल्यास त्यांना उत्पादन खर्च वजा करता सात लाखाचा नफा होण्याची शक्यता आहे.

शेवंतीच्या फुलाला दुर्गादेवी उत्सव आणि गणपती उत्सव या काळामध्ये मोठी मागणी असते. दोन वर्षांचा आनुभव लक्षात घेता एका किलोला दोनशे रूपयेच्या पुढे दर भेटतो.


२५ गुंठे क्षेत्रावर आठ हजार रोपांची लागण, एका किलोचा दर सध्या १२० रुपये आठवड्यात दोन तोडे एका तोड्याला दोनशे किलो फुले, चार महिने फुलांचे तोडे सुरू राहणार आहेत. उत्पादन खर्च एक लाख रुपये... तर खर्च वजा करता सात लाखाचा नफा दुर्गादेवी गणपती उत्सव या काळात दर वाढतात.


माझे मित्र संजय चव्हाण आणि मी आम्ही टोमॅटोची शेती करण्या ऐवजी शेवंतीच्या फुलाची लागवड केली आहे. दर चांगला भेटत असून चार महिने फुलांचे तोडे सुरू राहणार आहे. खर्च जाऊन सात लाखाचा नफा मिळेल.
- शुभम चव्हाण,
शेतकरी कोपर्डे हवेली.



०३कोपर्डे हवेली

कोपर्डे हवेली येथील शुभम चव्हाण यांच्या शेतात पिकवलेली फुले बाजारपेठेत निघाली आहेत. (छाया : शंकर पोळ)

Web Title: Sugarcane has been planted on the outskirts of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.