आरळेत २५ एकरवरील ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:38 AM2021-03-05T04:38:19+5:302021-03-05T04:38:19+5:30
शिवथर : आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे ...
शिवथर : आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आग कशी लागली की लावली गेली, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.
याबाबत आरळे येथील मळवी या शिवारात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत १९ शेतकऱ्यांचा आठ हेक्टरवरील ऊस जळून खाक झाला. यात जवळ जवळ २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनसह इतर शेतीचे साहित्यसुद्धा जळाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केला; परंतु आग एवढ्या मोठ्या प्रमाणात वर लागली होती की ती विझविणे शक्य झाले नाही. या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा गावकामगार तलाठी गणेश भगत यांनी केला असून, संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली आहे.
०४शिवथर
आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.