कराडमध्ये टेस्टिंग वाढविण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:48+5:302021-03-07T04:35:48+5:30
आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी शुक्रवारी पालिकेत कोरोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन केले होते. गटनेते राजेंद्र यादव, मुख्याधिकारी रमाकांत ...
आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी शुक्रवारी पालिकेत कोरोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन केले होते. गटनेते राजेंद्र यादव, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य विभागाचे प्रमुख रफिक भालदार, नागरी आरोग्य केंद्राच्या डॉ. शीतल कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शहरात २२ रुग्ण शुक्रवारअखेर ॲक्टिव्ह आहेत. जानेवारी महिन्यापासून शहरात हळूहळू रुग्ण सापडू लागले आहेत. त्यापूर्वी पालिकेच्या उपाययोजनांनी संसर्ग मंदावलेला होता; मात्र आता अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरू आहेत. बाजारपेठेत गर्दीही होत आहे. त्यातच जिल्ह्यासह राज्यात संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरात टेस्टिंगचे प्रमाण पुन्हा वाढवावे, त्यासाठी नागरी आरोग्य केंद्रास आवश्यक ते मनुष्यबळ पुरवले जाईल. रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या कॉन्टॅक्ट टेसिंगवर भर द्यावा. मास्क, सोशल डिस्टन्सबाबत कारवाईवर भर द्यावा, असे राजेंद्र यादव यांनी सांगितले.
विजय वाटेगावकर यांनी यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिक व व्याधीग्रस्त यांचे लसीकरण वेगाने होण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या.