जलआराखड्यावर सूचना, हरकती द्या : शिवतारे

By admin | Published: July 10, 2015 10:08 PM2015-07-10T22:08:05+5:302015-07-10T22:08:05+5:30

पंधरा दिवसांची मुदत : उर्ध्व कृष्णा उपखोरेच्या संकेतस्थळावर आराखडा प्रसिद्ध

Suggestions on the water table, give objection: Shivaratare | जलआराखड्यावर सूचना, हरकती द्या : शिवतारे

जलआराखड्यावर सूचना, हरकती द्या : शिवतारे

Next

कऱ्हाड : राज्य शासनाचा जलसंपदा विभाग व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्यावतीने एकात्मिक राज्य जलआराखडा उर्ध्व कृष्णा उपखोरे (के १) संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेला असून याबाबत १५ दिवसात लेखी स्वरूपात अधिकाऱ्यांना सूचना किंंवा हरकती द्याव्यात, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
येथील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये शुक्रवारी जलसंपदा विभाग, कृष्णा खोरे विकास महामंडळ, कृष्णा खोरे एकात्मिक राज्य जल आराखडा अंतर्गत उर्ध्व कृष्णा उपखोऱ्यातील (के १) लाभधारक घटकांची सल्लामसलत कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री शिवतारे बोलत होते. यावेळी आमदार उल्हास पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक आर. बी. घोटे, मुख्य अभियंता बी. ए. शहा, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, सांगलीचे एच. बी. गुणाले, कोल्हापूरचे साळुंखे, उरमोडीचे कार्यकारी अभियंता शरद दाभाडकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री शिवतारे म्हणाले, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण २००५ मध्ये करण्यात आले. त्याची अंमलबजावणी केली असती तर सिंंचनाचे काम सुरळीत झाले असते. १९६२ ते १९८७ या कालावधीत ६ आयोग होते. या सर्वांनी जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात तसेच शाश्वत उपसासिंंचन योजना मापदंड न करता करायला हवी. त्याचबरोबर जलसंपदाची कामे करा, अशा सूचना केल्या होत्या. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने सुरु केले आहे. मोठमोठ्या उद्योजकांना निमंत्रित करताना त्यांना सामाजिक सुरक्षितता दिली पाहिजे. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सर्व प्रकल्प पूर्ण करुन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम निश्चितपणे होईल. त्यासाठी येत्या १५ दिवसात लेखी स्वरुपात हरकती, सूचना अधिकाऱ्यांकडे द्याव्यात.
आमदार उल्हास पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. समप्रमाणात पाणी वाटप करा. दुष्काळी भागाकडे सर्वप्रथम पाणी देऊन मग उर्वरित पाणी पुढे द्यावे, अशी सूचना माजी आमदार येळगावकर यांनी केली. अधीक्षक अभियंता घोगरे यांनी जिल्ह्याचे संगणकीकृत सादरीकरण केले. (प्रतिनिधी)

Web Title: Suggestions on the water table, give objection: Shivaratare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.