लग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 07:42 PM2021-03-23T19:42:02+5:302021-03-23T19:43:16+5:30

Crime Satara-भोगाव येथील प्रतिक अंकुश येवले (वय २२) याने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलाला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत चुलते अशोक सोमाजी येवले यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Suicide for not getting married | लग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या

लग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्या

Next
ठळक मुद्देलग्न होत नसल्याने मानसिक तणावाखाली आत्महत्यावाई पोलीस तपास करीत आहेत.

वाई : भोगाव येथील प्रतिक अंकुश येवले (वय २२) याने सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास राहत्या घरात लोखंडी अँगलाला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत चुलते अशोक सोमाजी येवले यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाई पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, प्रतिक गेली काही वर्षे लग्न ठरत नसल्याने मानसिक तणावाखाली असायचा. त्यातूनच घरातील काहीजण शेतात गेल्याने प्रतिक याने घरातीलच लोखंडी अँगलला नाईलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

परंतु घरातीलच लोकांच्या लक्षात येताच त्याला त्वरित वाईतील खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. वाई पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Suicide for not getting married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.