कर्जबाजारी दाम्पत्याची तीन चिमुरड्यांसह आत्महत्या
By admin | Published: March 14, 2017 02:24 PM2017-03-14T14:24:14+5:302017-03-14T14:24:14+5:30
कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्याने आपल्या तीन चिमुरड्यांसह मंगळवारी पहाटे कोयना नदीपात्रात उडी घेतली.
Next
ऑनलाईन लोकमत
सातारा, दि. 14 - कर्जाबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्याने आपल्या तीन चिमुरड्यांसह मंगळवारी पहाटे कोयना नदीपात्रात उडी घेतली. आत्महत्या करणा-या पती या घटनेतून बचावला आहे. मात्र, पत्नीसह तीन मुले यांचा बुडून मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी दुपारी एका मुलाचा मृतदेह हाती लागला असून पत्नीसह अन्य दोन मुलांचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.
मलकापुरातील बैलबाजार रोडलगत राहणा-या अमोल भोंगाळे (वय २८) व मिनाक्षी (वय२३) या दाम्पत्याने हर्ष (साडेतीन वर्ष), श्रवण (दीड वर्ष) व चार महिन्यांच्या मुलीसह नदीपात्रात उडी घेतली होती. रविवारी पहाटे हे दाम्पत्य दुचाकीवरून कोल्हापूर नाक्यानजीकच्या नवीन कोयना पुलावर आले.
पुलावरून त्यांनी आपल्या तीन चिमुरड्यांसह नदीपात्रात उडी घेतली. मात्र, काही वेळानंतर पती अमोल नदीपात्रातून सुरक्षितरीत्या बाहेर पडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही त्याठिकाणी पोहोचले. अमोलला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर बेपत्ता आई व दोन मुलांचा शोध सुरू आहे. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दीड वर्षाच्या श्रवणचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मिनाक्षी, हर्ष व चार महिन्यांच्या मुलीचा नदीपात्रात शोध घेतला जात आहे.