रणसिंगवाडीच्या सरपंचपदी सुखदेव रणसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:10+5:302021-03-04T05:14:10+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रणसिंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव सर्जेराव रणसिंग, तर उपसरपंचपदी विठ्ठल ...
पुसेगाव : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रणसिंगवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव सर्जेराव रणसिंग, तर उपसरपंचपदी विठ्ठल बबन मसुगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुखदेव रणसिंग यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ खंडोबा ग्रामविकास पॅनेलला सात जागा मिळाल्या असून, विरोधी पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. या सभेस सुखदेव रणसिंग, विठ्ठल मसुगडे, हणमंत जाधव, सुवर्णा मसुगडे, शुभांगी घाडगे, जयश्री शिंदे, नीलम फडतरे हे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून घोरपडे व ग्रामसेवक संजय काळेल यांनी काम पाहिले. या निवडीबद्दल त्यांचे सुनील फडतरे, बापूराव बागल, उदय फडतरे, लक्ष्मण जाधव, विलास जाधव, उमेश फडतरे, हणमंत जाधव, अमोल फडतरे, सुभाष पोतेकर, सुभाष शिंदे, दत्तात्रय शिंदे, शंकर मसुगडे, शंकर शिंदे, चंद्रकांत पालकर व ग्रामस्थांनी कौतुक केले.
०३रणसिंगवाडी
छायाचित्र : रणसिंगवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी हात उंचावून जल्लोष केला.