पर्यटकांचा मार्ग होणार सुकर मकरंद पाटील : महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यासाठी साडेतेरा कोटी मंजूर
By admin | Published: May 15, 2014 11:34 PM2014-05-15T23:34:28+5:302014-05-15T23:37:28+5:30
वाई : पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, भाडळे, दहिवडी या राष्ट्रीय महामार्ग १३९ दर्जाच्या ४४ ते ६४ किलोमीटर महाबळेश्वर ते पाचगणी हा रस्ता अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १३ कोटी ५० लाख
वाई : पोलादपूर, महाबळेश्वर, वाई, भाडळे, दहिवडी या राष्ट्रीय महामार्ग १३९ दर्जाच्या ४४ ते ६४ किलोमीटर महाबळेश्वर ते पाचगणी हा रस्ता अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. आ. पाटील म्हणाले, ‘जगभरातून तसेच अन्य भागांतून येणार्या पर्यटकांना तसेच स्थानिक पर्यटकांना महाबळेश्वर या पर्यटनस्थळाकडे जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची वाहतूक वर्दळ सरसरी ३३३४२ मे. टन प्रतिदिन इतकी असून महाबळेश्वर तालुक्याचे सरासरी ६५०० मिमी पर्जन्यमानातही हा रस्ता सुरक्षित राहणार आहे. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने खराब झाला होता. मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामात १२ मीटरपर्यंत रुंदी केली जाणार आहे. धावपट्टीचे रुंदीकरण ७ मीटर करावयाचे आहे. यासाठी ७५ मिमी जाडीचा बीबीएम व पूर्ण रुंदीसाठी ५० मिमी जाडीचा बीएम, २५ मिमी जाडीचे कारपेट सीलकोटसह करावयाचे आहे. मंजूर रस्त्याअंतर्गत असणार्या ४४ मोर्यांपैकी ३७ मोर्यांचे रुंदीकरण होणार आहे. घाट लांबी आणि आवश्यक ठिकाणी ३९० मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. यामुळे स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून दळणवळणाच्या दृष्टीने रोजगार वाढण्यास मदत होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा हा रस्ता सर्वानाच फायदेशीर ठरणार आहे. हा रस्ता लवकर पूर्ण होण्यासाठी आमदार पाटील यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)