कोरोना चाचणीच्या भीतीने मलकापुरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:38 AM2021-05-26T04:38:59+5:302021-05-26T04:38:59+5:30
लॉकडाऊनची कडक अमलबजावणी लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मलकापूर पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करीत मंगळवारी पहिल्याच दिवशी ...
लॉकडाऊनची कडक अमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूर पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करीत मंगळवारी पहिल्याच दिवशी शहरात तपासणी नाक्यावर कसून चौकशी करतानाच शहरातील २६ रस्ते सील केले. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार असल्याने प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता. दिवसभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून ४ हजार ८०० रुपयांचा दंड पोलिसांकडून वसूल करण्यात आला.
मलकापूरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याकरीता सर्व प्रभाग अध्यक्षांची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये ९ ठिकाणी तपासणी नाके, दाट वस्ती असणाऱ्या भागातील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करणे व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करून त्यांना १४ दिवसांसाठी विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी पालिकेच्यावतीने शहरात येणारे सर्व प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मलकापूरचे मुख्य प्रवेशद्वार मलकापूर फाटा, शिवछावा चौक व बैलबाजार रस्या या ठिकाणी बॅरिकेट लावण्यात आले. तसेच ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आगाशिवनगर येथे इमर्सन कंपनी, शिवछावा चौक, मलकापूर फाटा, बैलबाजार रोडसह ९ ठिकाणी व शहरात ये-जा करणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जात होती. या ठिकाणी दिवसभर पालिकेचे कर्मचारी तळ ठोकून होते. मात्र, रस्त्यांवरच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट होता. केवळ वैद्यकीय कारणास्तव नागरिकांना इतरत्र जाण्याची सूट देण्यात येत होती.
पालिकेच्यावतीने शहरातील २६ कॉलन्यांचे मुख्य रस्ते सील केले होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिवसभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून ४ हजार ८०० रूपये एवढा दंड वसूल केला. शहरातील तपासणी नाक्यावर नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, सर्व प्रभाग अध्यक्ष, नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
फोटो : २५ मलकापूर
मलकापूर येथील रस्त्यांवर मंगळवारी दिवसभर असा शुकशुकाट पसरला होता. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
250521\195-img-20210525-wa0021.jpg
===Caption===
मलकापूरात रस्त्यांवरच कोरोना चाचणी होणार या भितीने शहरात शुकशुकाट जाणवत होता. (छाया- माणिक डोंगरे)