म्होप्रेच्या सरपंचपदी सुमन माने बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:42+5:302021-03-04T05:12:42+5:30
म्होप्रेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच जागेवर रयत विकास पॅनेलने बहुमत मिळवले होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्य विकास संकपाळ, पोपटराव डुबल, अनिल ...
म्होप्रेच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच जागेवर रयत विकास पॅनेलने बहुमत मिळवले होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्य विकास संकपाळ, पोपटराव डुबल, अनिल यादव, सुमन माने, सुमन डुबल, वंदना डुबल, शामल कांबळे, शकुंतला गुरव यांची निवड झाली. पॅनल प्रमुख अॅड. संभाजीराव संकपाळ, माजी सरपंच तुकाराम डुबल, संजय संकपाळ, दीपकराव डुबल व कार्यकर्ते यांनी निवड बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले.
सरपंच पद हे ओपन महिला राखीव होते. नुकतेच म्होप्रे ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडीत सरपंचपदी सुमन माने तर उपसरपंचपदी विकास संकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील शिर्के, ग्रामसेवक दीपक कदम, तलाठी प्रतिभा मुखेडकर, विस्तार अधिकारी मुळे यांनी काम पाहिले. निवडीबद्दल म्होप्रे गावातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था, विविध गणेश व दुर्गामाता मंडळे, महिला बचत गट व ग्रामस्थांच्यावतीने सरपंच, उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.
फोटो : ०२केआरडी०१
कॅप्शन : म्होप्रे ता. कऱ्हाड येथील नूतन सरपंच, उपसरपंचांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. (छाया : सुनील साळुंखे)