वंचितच्या उपाध्यक्षपदी सुनील लादे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:45 AM2021-09-17T04:45:34+5:302021-09-17T04:45:34+5:30
कऱ्हाड : येथील बुधवार पेठेतील सुनील लादे यांची ‘वंचित बहुजन आघाडी’च्या कऱ्हाड शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण ...
कऱ्हाड : येथील बुधवार पेठेतील सुनील लादे यांची ‘वंचित बहुजन आघाडी’च्या कऱ्हाड शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व जिल्हा महासचिव शरद गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तसेच बाळकृष्ण देसाई, शरद गाडे, तालुकाध्यक्ष प्रा. दिलीप लोखंडे व शहराध्यक्ष संतोष बोलके यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही सुनील लादे यांनी निवडीनंतर बोलताना दिली. सुनील लादे हे शहरातील बुधवार पेठेत वास्तव्यास असून, बहुजन समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची ही निवड करण्यात आली. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक चळवळीला बळ देऊन ही चळवळ अधिक बळकट करण्यासाठी कार्यकारिणी सदस्य प्रयत्नशील असल्याचेही सुनील लादे यांनी सांगितले.
फोटो : १६सुनील लादे