रेशनिंग दुकानदाराची चौकशी : पुरवठा विभागाची ल्हासुर्णेत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 02:48 PM2020-01-30T14:48:12+5:302020-01-30T14:48:55+5:30
लोकमतने २९ जानेवारीच्या अंकात शिवभोजनचा थाट अन् रेशनिंग ग्राहकांना बाहेरची वाट,ह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ल्हासुर्णेतील रेशनिंग ग्राहक सुरेश जगन्नाथ घाडगे यांचे केशरी रेशनिंग कार्ड आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे धान्य बंद झाले.
सागर गुजर ।
सातारा : कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे गावचे रेशनिंग ग्राहक सुरेश जगन्नाथ घाडगे यांना गेल्या दोन वर्षांत धान्यच मिळत नव्हते. याबाबत ह्यलोकमतह्णने आवाज उठविल्यानंतर पुरवठा विभागाने ल्हासुर्णे गावात धाव घेऊन रेशनिंग दुकानदाराची चौकशी केली तसेच घाडगे यांच्यासह प्राधान्यक्रम यादीत नाव आलेल्या ग्राहकांना दोन महिन्यांत रेशनिंग सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
लोकमतने २९ जानेवारीच्या अंकात शिवभोजनचा थाट अन् रेशनिंग ग्राहकांना बाहेरची वाट,ह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ल्हासुर्णेतील रेशनिंग ग्राहक सुरेश जगन्नाथ घाडगे यांचे केशरी रेशनिंग कार्ड आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे धान्य बंद झाले. धान्य मिळण्यासाठी त्यांनी रेशनिंग दुकानदारापासून तालुका पुरवठा विभागाचे उंबरे झिजवले; मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर त्यांनी लोकमतकडे धाव घेतली. या गरीब शेतकऱ्याची लोकमतने व्यथा मांडल्यानंतर पुरवठा विभागाने धावाधाव करून त्यांचे नाव प्राधान्यक्रम यादीत असल्याची खात्री घाडगे यांना दिली.