शेतकऱ्यांच्या मागण्यांना अंनिसचा पाठिंबा

By admin | Published: June 10, 2017 01:45 PM2017-06-10T13:45:21+5:302017-06-10T13:45:21+5:30

वाईत राज्यस्तरीय परिषद : जवाब दो आंदोलन २0 जुलैपासून

Support for the demands of farmers | शेतकऱ्यांच्या मागण्यांना अंनिसचा पाठिंबा

शेतकऱ्यांच्या मागण्यांना अंनिसचा पाठिंबा

Next

आॅनलाईन लोकमत

सातारा, दि. १0 : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांना महाराष्ट्र अंनिसने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करण्यात आले असून, महाराष्ट्र अंनिसचे २०२५ ध्येयनिश्चितीच्या आखणीबाबतचे नियोजन करण्यात आले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्यस्तरीय विस्तारीत कार्यकारिणी बैठक वाई, जि. सातारा येथे दि. २, ३, ४ जून २०१७ रोजी संपन्न झाली. त्यामध्ये सद्या सुरु असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणी आंदोलनाला आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी वगार्तील निराशा व संताप दूर करण्यासाठी सरकारकडून संवाद प्रक्रिया जारी ठेवून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग लवकरात लवकर काढणे आवश्यक आहे, अशी भूमिका अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र अंनिसच्या वाई येथील विस्तारीत राज्य कार्यकारिणी बैठकीत अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसाठी संघटीत कार्याच्या वाटचाली त२०२५ वर्षापर्यंत करावयाच्या ध्येय निश्चितीसाठी चर्चा करण्यात आली.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे व प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासातील पाठपुरावा अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आणि सरकारला उत्तरदायी व्हायला भाग पाडण्यासाठी जवाब दो आंदोलन येत्या २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात राबविणार आहे.


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ सहकारी कुमार मंडपे (सातारा), प्रा. प. रा. आर्डे (सांगली) आणि शालिनीताई ओक (सोलापूर) या उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र अंनिसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा दृकश्राव स्वरुपातील सदिच्छा संदेश दाखविण्यात आला.

विस्तारीत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे संयोजन महाराष्ट्र अंनिसच्या वाई शाखेच्या पुढाकाराने करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसच्या राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुशिला मुंडे, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार आणि सातारा जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप डोंबिवलीकर, जिल्हा प्रधान सचिव चंद्रहार माने, वाई शाखा अध्यक्ष डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनात अडीच दिवसीय विस्तारीत राज्य कार्यकारिणीचे यशस्वी संयोजन केले.

Web Title: Support for the demands of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.