अडतच्या बंदला विक्रेत्यांचा पाठिंबा...

By admin | Published: July 13, 2016 11:27 PM2016-07-13T23:27:36+5:302016-07-13T23:27:36+5:30

शेतकरी संघटनेकडून निषेध : दलाल, व्यापाऱ्यांवर टीका; पुतळा दहनचा प्रयत्न, परवाने रद्द करण्याची मागणी

Supporters of Bandh Bandh support ... | अडतच्या बंदला विक्रेत्यांचा पाठिंबा...

अडतच्या बंदला विक्रेत्यांचा पाठिंबा...

Next

सातारा : खरेदीदाराकडून अडत वसूल करण्याच्या निषेधार्थ अडत व्यापाऱ्यांचे चार दिवसांपासून बंद आंदोलन सुरू आहे. बुधवारी या बंदला भाजीविक्री करणाऱ्या व्यावसायिकांनीही पाठिंबा देत मंडई बंद ठेवली. तर शेतकरी संघटनेने बंद पुकारणाऱ्या दलाल व व्यापाऱ्यांचा निषेध करून पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अडत्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी करण्यात आली.
अडतच्या बंदला चार दिवस होऊनदेखील कोणताच निर्णय शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे या बंदची व्याप्ती वाढली आहे. बंदमुळे माल मिळत नसल्याने भाजी विक्रेत्यांनीही बंद पुकारला आहे. अडते आम्हाला उधार माल देतात शेतकऱ्यांकडून उधार मिळत नाही. त्यामुळे अडत्यांमुळेच आमचा प्रपंच चालत असल्याने या बंदला आम्ही स्वत:हून पाठिंबा दिला आहे. शासनाच्या या धोरणामुळे अडते बरोबर आम्हीही अडचणीत आलो असल्याने बुधवारपासून बेमुदत बंद केले असल्याचे येथील विक्रेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, भाजी विक्रेत्यांनी बंद केला असला तरी शेतकरी आपला स्वत:चा माल स्वत:च विकत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय झाली नसली तरी दरांची चढाओढ होत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली.
अचानक भाजी विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदमुळे आज ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. महात्मा फुले भाजी मंडई, राजवाडा भाजी मंडई व पोवई नाका भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी बुधवारी कडेकोट बंद पाळला असला तरी नाक्यावरील भाजी मंडईत शेतकऱ्यांनी भाजीविक्री सुरूच ठेवली होती. त्यामुळे या बंदचा येथे काहीच परिणाम जाणविला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Supporters of Bandh Bandh support ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.