सूरज मदनेने जिंकला ५१ हजारांचा किताब

By Admin | Published: December 15, 2015 09:38 PM2015-12-15T21:38:18+5:302015-12-15T23:25:08+5:30

नाना खांडेकर चितपट : मायणीच्या सिद्धनाथ यात्रेतील कुस्ती स्पर्धेत रोमांचक लढती

Suraj Madane won a book of 51 thousand | सूरज मदनेने जिंकला ५१ हजारांचा किताब

सूरज मदनेने जिंकला ५१ हजारांचा किताब

googlenewsNext

मायणी : येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त भारतमाता विद्यालयाच्या कुस्ती आखाड्यात घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पुण्याच्या सूरज मदने याने म्हसवडच्या नाना खांडेकरला चितपट करून ५१ हजारांचा किताब पटकावला.
येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी व ग्रामपंचायत यांच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व मायणी अर्बन बँकेचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
या कुस्ती मैदानात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यांतून मल्लांनी हजेरी लावली होती. यामध्ये मायणीच्या गोपी पाटोळे याने आटपाडीच्या धीरज गिड्डेला चितपट करून २५ हजारांचा किताब पटकावला. या मैदानात दहा रुपयांपासून ते २५ हजारांपर्यंतच्या कुस्ता झाल्या.
आखाड्याचे उद्घाटन श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे मानकरी विकास देशमुख, श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक सचिव सुधाकर कुबेर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, यात्रा कमिटीचे चेअरमन जनार्दन देशमुख, सरपंच महादेव यलमर, उपसरपंच प्रकाश कणसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमारे मोरे, माजी उपसभापती बाळासाहेब माने, प्रा. सदाशिव खाडे, सदाशिव मुळीक, मधुकर पाटील, बाबासाहेब पाटील, रवी सानप, सुदाम घाडगे, विठ्ठल पाटील, डी. एम. पाटील, महादेव माळी, बबनराव देशमुख, शंकर फडतरे, बापूराव वाघमारे, चंद्रकांत सानप, नाथा दबडे, विश्वनाथ सपकाळ, प्रकाश घाडगे, रघूनाथ खाडे, नंदकुमार कुलकर्णी, शांताराम शेडगे, भानुदास सानप, युवराज शिंदे, रामभाऊ मदने, भगवान कदम, वसंत यलमर आदी उपस्थित होते.
पंच म्हणून सुरेश कदम, धोंडिराम हटकर, अशोक पाटील, श्रीमंत कोकरे, रामभाऊ सोमदे यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादासाहेब कचरे, अनिल माळी, महेश जाधव, हेमंत जाधव, रणजित माने, अरुण जाधव, अरुण सुरमूख आदींनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Suraj Madane won a book of 51 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.