...आता दाखले वेगाने मिळणार : सुरेश खाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:20 PM2019-06-24T12:20:53+5:302019-06-24T12:24:31+5:30

जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Suresh Khade will be getting the speed of the exams now | ...आता दाखले वेगाने मिळणार : सुरेश खाडे

...आता दाखले वेगाने मिळणार : सुरेश खाडे

googlenewsNext
ठळक मुद्दे...आता दाखले वेगाने मिळणार : सुरेश खाडे पारदर्शकता आणण्यासाठी शासन प्रयत्नशील

सातारा : जनतेला जातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेगाने कसे मिळतील, यासाठी शासन आग्रही असून, या दाखल्यांच्याबाबतीत जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल, यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, ह्यजातीचे तसेच जातपडताळणीचे दाखले वेळेत मिळत नसल्याने अनेकांना शासकीय नोकरी मिळण्यात अडथळे निर्माण होतात. शिक्षणाच्या बाबतीतही या समस्या जाणवतात, त्यामुळे हे दाखले उमेदवारांना लवकरात लवकर कसे मिळतील, यासाठी शासन नियोजन करत आहे.

फास्ट ट्रॅक यंत्रणेच्या माध्यमातून हे केले जाणार आहे. प्रशासकीय यंत्रणेला ठराविक मुदतीत दाखले देण्याची सक्ती केली जाईल, यासाठी असलेल्या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून हे दाखले देण्यासाठी पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे.

सामाजिक न्याय खाते हे गरीब लोकांच्या कल्याणासाठी काम करते, सुदैवाने मंत्रिपदाचा पदभार घेताच या खात्यासाठी सरकारने १२०० कोटींची तरतूद केली. गतवर्षीच्या बजेटपेक्षा यंदा ५०० रुपये सामाजिक न्याय खात्याला वाढवून मिळाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गरिबांच्या उथ्थानासाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर दिला आहे, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले.

दरम्यान, दिव्यांग व्यक्तींना घरकुल बांधून दिले जाणार आहे. ८० टक्के अपंगत्व असणाऱ्या दिव्यांगांना त्याचा लाभ होईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कामे केली जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही सरकार विशेष योजना राबवत आहे, असेही त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा परिषदेला पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी कधी देणार आहात? या प्रश्नावर मंत्री डॉ. खाडे म्हणाले, संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी ही पदे रिक्त आहे. एका अधिकाऱ्यांकडे दोन पदभार दिले आहेत. ही पदे भरण्यासाठी शासनाने तयारी सुरू केली आहे. लवकरच यासाठी परीक्षा घेतली जाईल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार किंवा बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाणार आहे, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय भवन बांधकामाची चौकशी

साताऱ्यातील सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामात दोष असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विचारले असता डॉ. खाडे यांनी या कामाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

येळगावकरांसोबत काम करु

माण-खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्याशी आपली जुनी मैत्री आहे. विरोधात काम करत असताना त्यांनी आणि मी अधिवेशन काळात विधिमंडळ दणाणून सोडले होते. अनेक वृत्तपत्रांच्या हेडलाईन्स आमच्या अनोख्या आंदोलनांनी गाजल्या. आता डॉ. येळगावकरांसोबत पुन्हा काम करण्याची आपली इच्छा आहे, असेही डॉ. खाडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Web Title: Suresh Khade will be getting the speed of the exams now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.