राष्ट्रवादी बालेक्ल्ल्यिावर कमळाचा सर्जिकल स्टाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 07:42 PM2019-02-02T19:42:32+5:302019-02-02T19:43:56+5:30

सहकारामध्ये मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदनदादा भोसले यांचे किसनवीर,तीनही सहकारी साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत. त्याबरोबरच स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठीही आता मदन भोसले यांना निर्णय घ्यावा

Surgical Styke of Lotus on Nationalist Ballecline | राष्ट्रवादी बालेक्ल्ल्यिावर कमळाचा सर्जिकल स्टाईक

राष्ट्रवादी बालेक्ल्ल्यिावर कमळाचा सर्जिकल स्टाईक

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मदनदादा कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता

पाचवड : सहकारामध्ये मातब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदनदादा भोसले यांचे किसनवीर,तीनही सहकारी साखर कारखाने सध्या अडचणीत आहेत. त्याबरोबरच स्वत:च्या राजकीय अस्तित्वासाठीही आता मदन भोसले यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. भाजप मंत्र्यांच्या उपस्थितीत कारखाने आणि मदनदादा या दोघांच्याही भविष्याची नौका तीराला लागणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

भाजपच्यानेत्यांची मांदियाळी सातारा-पुणे जिल्'ाच्या सरहद्दीवर खंडाळा येथील किसनवीर खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या को-जन प्रकल्पाच्या उद्घाटन निमित्ताने एकत्रित येत आहे. काँग्रेस विचारधारेशी एकनिष्ठ असलेले मदनदादा भोसले यांच्या किसनवीर उद्योग समूहाच्या व्यासपीठावर भाजपाच्या मुख्यमंत्र्यांसह नेत्यांची उपस्थिती नक्कीच दादाप्रेमी व काँग्रेसच्या गोटात खळबळ करणारी आहे. मात्र, भाजपने किसनवीर उद्योगसमूहाच्या व्यासपीठावरून वाई-खंडाळा-महाबळेश्वर या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यावरच सर्जिकल स्ट्राईक केला असून, या दिग्गजांच्या उपस्थितीत किसनवीरचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांचा भविष्यातील राजकीय श्रीगणेशा होणार का? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

क्रांतिवीर किसनवीर आबा व तत्कालीन सहकाºयांनी उभ्या केलेल्या किसनवीरच्या सहकार मंदिरात कार्यक्रमानिमित्त उपस्थितीत राहणारे भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री आहेत. किसनवीरचे उपाध्यक्ष गजानन बाबर यांच्या हातात विकासाचा कोरा चेक देऊन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघातील भविष्यातील राजकीय वादळाची पूर्व कल्पना दिली होती. म्हणूनच याची उतराई किंवा ॠणनिर्देश करण्याच्या औपचारिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री येत असले तरी काळाच्या गर्भात लपलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्यासपीठावरून मिळणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपाची व त्यांची होणारी जवळीक राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसपक्षालाही मोठी हानी पोहोविणारी आहे. तर मदानदादांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून भाजपा लोकसभेसाठी की विधानसभेसाठी उपयोग करू शकते. आमदार मकरंद पाटील यांची पकड असलेल्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाबरोबरच जिल्'ातील अनेक मतदार संघांतील बेरजा व वजाबाक्या करणारा हा कार्यक्रम ठरणारा असून, मदनदादा भोसले लोकसभेला की विधानसभेला याचाही श्रीगणेशा खंडाळ्यातील गणेश मंदिराच्या भूमिपूजनाबरोबरच होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही.

प्रतापराव भोसले मदनदादांना काँग्रेसबाहेर पडू देणार?
राज्याच्या राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांनी नेहमीच यशवंत विचारांचे तत्त्व आणि सत्त्व जपले आहे. तर त्यांचे सुपुत्र मदनदादा भोसले हे भाजपाशी जवळीक साधत आहेत. त्यामुळे वाई तालुक्याबरोबरच जिल्'ातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रतापराव भोसले मदनदादांना काँग्रेसबाहेर जाऊ देणार नाहीत, अशी भाबडी आशा कार्यकर्त्यांना आहे.

Web Title: Surgical Styke of Lotus on Nationalist Ballecline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.