ऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:31 PM2020-11-28T15:31:32+5:302020-11-28T15:33:23+5:30

crimenews, onion, farmar, sataranews विडणी, ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोदामातून ४५ हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या पिशव्यांची चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

Surprising to hear: A bag of onions was stolen from the warehouse | ऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस

ऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस

Next
ठळक मुद्देऐकावे ते नवल : गोदामातून कांद्याच्या पिशव्याच चोरीस विडणी परिसरातील शेतकऱ्यांत घबराट

फलटण : विडणी, ता. फलटण येथील शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या कांद्याच्या गोदामातून ४५ हजार रुपये किमतीच्या कांद्याच्या पिशव्यांची चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

विजेचा लपंडाव, रात्री-अपरात्री विंचू काट्याचा धोका पत्करून, रक्ताचे पाणी करून शेतकरी पिके जोपासत असतो. त्यात नुकतीच अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांची उभी पिके शेतात नासून गेली. यातून काही शेतकऱ्यांना शेतातील कांदा वाचवण्यात यश आले होते. कधी नव्हे एवढा कांद्याला सोन्याचा भाव मिळू लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे खेळू लागले. यावर चोरट्यांनी डोळा ठेवला आहे.

विडणी येथील २५ फाटा नाळे वस्ती येथून भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनील विठ्ठल नाळे या शेतकऱ्यांनी घराशेजारी असणाऱ्या कांदा साठवून ठेवलेल्या पत्र्याच्या शेड गोदामात तिघांचे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा साठ ते पासष्ठ किलो वजनाच्या जवळपास एक टन वजनाच्या पंधरा कांद्याच्या पिशव्या ठेवल्या होत्या. त्या रात्री बारा ते एकच्या दरम्यान चोरट्यांनी गोडावूनमधून लंपास केल्या.

दरम्यान, कुत्री भुकंण्याच्या आवाजाने संबंधित मालकाला जाग आल्यावर घराशेजारील कांद्याच्या पिशव्या चोरट्यांनी चोरून नेल्याचे मालकाच्या लक्षात आले. सकाळी पोलीस पाटील धनाजी नेरकर यांना या घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाणेत कळविली. फलटण ग्रामीण पोलीस ठाणेतील कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली. याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाणेत भरत नाथबुवा नाळे, सुरेश विठ्ठल नाळे, सुनील विठ्ठल नाळे यांनी तक्रार दाखल केली आली आहे.

Web Title: Surprising to hear: A bag of onions was stolen from the warehouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.