कोरोनामुक्त गावातील शाळा सुरू करण्यासाठी सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:26 AM2021-06-29T04:26:10+5:302021-06-29T04:26:10+5:30
सातारा : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये ...
सातारा : ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसत आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये शाळा सुरू करता येतील का, यासंबंधीचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात कोविड रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरीही कोरोनाबाधितांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या पुढे गेले आहे. त्यातच राज्यावर डेल्टाचे आक्रमण गृहीत धरून प्रशासन अधिक सजग झाल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू करायच्या का? याबाबत गावपातळीवर माहिती घेऊन मग पुढील कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ०० गावे सध्या कोरोनामुक्त झाली आहेत. या गावातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या ००० शाळा आगामी काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालक विद्यार्थ्यांशी संपर्क साधून शाळा सुरू करण्याबाबत त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. त्यात बहुतांश पालकांनी शाळा पूर्ववत सुरू कराव्यात अशी मते नोंदविली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. वर्षभरापासून विद्यार्थी हे घरातच आहेत. रोज घरात राहून ऑनलाइन शिक्षण पध्दतीला विद्यार्थी कंटाळले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर निर्बंध येत आहेत. शाळेत गेल्यावर आपल्या मित्रमैत्रिणींना भेटता येईल ही ओढ विद्यार्थ्यांना लागून आहे, त्यामुळे यंदा तरी प्रत्यक्ष शाळेला सुरुवात होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती, पण दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
जिल्ह्यात पाचवी ते आठवी वर्गाच्या एकूण शाळांची संख्या ०० असून, एकूण विद्यार्थी ००० आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात अशी अपेक्षा आहे.
चौकट :
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मोठे नुकसान झाले आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरीही विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. शाळा सुरू होणे गरजेचे असल्याचे मत पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केले आहे.
कोट :
ग्रामीण भागातील शाळा आॅनलाइन पध्दतीने सुरू आहेत. मुख्याध्यापक तसेच ५० टक्के संख्येने शिक्षक हजर असतात. शिक्षक आॅनलाइन पध्दतीने शिकवतात. प्रत्यक्ष शाळेत विद्यार्थ्यांना बोलविण्याचे आदेश येताच तशी कारवाई केली जाईल. नियमाप्रमाणे शाळा सुरू केल्या जातील.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा
पॉर्इंटर
कोणत्या वर्गात किती विद्यार्थी
पाचवी : ४०६३२
सहावी : २६८५८
सातवी : २६५१९
आठवी : १७८९७
जिल्ह्यातील एकूण शाळा
जिल्हा परिषद शाळा : २६९३
विनाअनुदानित शाळा : ७०८१
अनुदानित शाळा : ३४४८९
जिल्ह्यातील कोरोना स्थिती
कोरोनामुक्त गावे :
एकूण गावे :